संचारबंदी /विकेंड लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची लातूर पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने तपासणी करून कोरोना बाधित आढळल्यास डायरेक्ट CCC ला रवानगी व बाधित नसल्यास दंड आकारणी मोहीम.*


           *संचारबंदी /विकेंड लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची लातूर पोलिस प्रशासन व आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने तपासणी करून कोरोना बाधित आढळल्यास डायरेक्ट CCC ला रवानगी व बाधित नसल्यास दंड आकारणी मोहीम.*









             लातूर जिल्ह्यामध्ये वाढता  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी/ वीकेंड लॉकडाऊन केलेला आहे. तरी पण लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत अशा विनाकारण रस्त्यावर फिरणारे लोकांवर आळा बसवण्या करिता पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर श्री.डॅनियल जॉन बेन, पोलीस निरीक्षक उदगीर शहर, श्री.गोरख दिवे ,पोलीस अमलदार व आरोग्य विभाग यांचे मार्फत उदगीर शहरांमध्ये विनाकारण बाहेर फिरत आहेत अशा लोकांना थांबवून त्यांची अँटीजेन टेस्ट केली जात असून  जे लोक पॉझिटिव्ह आहेत अशा लोकांची CCC ला रवानगी केली जात आहे. तसेच जे लोक पॉझिटिव्ह नाहीत विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत अशा लोकांकडून दंड आकारला जात आहे.

               आज उदगीर शहरात संयुक्त पथकाने एकूण 148 लोकाची तपासणी केली असून त्यामध्ये 10  कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने त्यांची CCC येथे पुढील उपचार  कामी रवानगी करण्यात आलेली आहे.

                 सदरची मोहीम संपूर्ण लातूर जिल्हा मध्ये  राबविण्यात येणार असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी केले आहे



या प्रकारची संयुक्त मोहीम पोलीस स्टेशन अहमदपूर हद्दीमध्ये राबविण्यात आली असून एकूण 23 लोकांची कोरोना antijen चाचणी करण्यात आली त्यापैकी 03 जण कोरोना पॉझिटिव आढळल्याने त्यांना CCC येथे पाठविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या