तपसे चिंचोली येथे कोरोना लसीकरण मोहीम ,200 लाभार्थ्यांना देण्यात आली लस
औसा प्रतिनिधी:-मुख्तार मणियार
कोरोना पासून बचावासाठी लस प्रभावी असल्याचे महत्त्व आता नागरिकांना पटले आहे. अर्थात लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे. लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या तपसे चिंचोली येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याची मागणी तपसे चिंचोली येथील ग्रामस्थांनी केली होती,यासंबंधी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केल्यानंतर गावात कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली .अखेर ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले.
तपसे चिंचोली हे जवळपास 4000 लोकसंख्याचे गाव असून लसीकरणासाठी गावातील वयोवृध्द ग्रामस्थांना 6 कि.मी. अंतरावर लस घेण्यासाठी लामजना येथे जावे लागते. गावात वयोवृध्द पुरूष व महिला यांचे प्रमाण जास्त असून तसेच शुगर, बी.पी. या आजाराचे नागरिक आहेत. त्यामुळे गावातच लस उपलब्ध करून बाहेर गावी जाण्याची नागरिकांची हेळसांड थांबेल व प्रशासनावरील ताण देखील कमी होईल. लामजना आरोग्य केंद्रास 7 कि.मी. वर जाण्यासाठी ग्रामस्थांना नाहक त्रास होत असल्याने तपसे चिंचोली येथे गावातच लसीकरण सुरू करून वयोवृद्धांची हेळसांड होऊ नये ही बाब लक्षात घेऊन तपसे चिंचोली येथे लसीकरण सुरू करावे अशी मागणी तपसेचिंचोली येथील ग्रामस्थांनी केली व अखेर लसीकरण सुरू झाले.
लसीकरणासाठी लसीचे डोस जवळपास 200 डोस तपसेचिंचोली येथे वितरित करण्यात आले. लसीकरणास गावातील कै. सुशिलाबाई त्रिंबकराव पाटील विद्यालयात प्रारंभ झाला व शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार सकाळी लसीकरण सुरू झाले. ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पेंढारकर ,पवार सर ,
मुसांडे मॅडम, अवचारे मॅडम ,प्रेमीला लादे , आरोग्य सेवक हासुरे वीरभद्र ,यादव पंडित आशा वर्कर्स जनाबाई वाघमारे ,काळे सुवर्णा , अंगणवाडी कार्यकर्त्या / मदतनीस संपता नेटके,छाया कांबळे,कालिंदा वडगावे ,लक्ष्मी कलशेट्टी ,कोमल नेटके ,जयश्री यादव , आदींनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप पेंढारकर , ग्रामसेवक विजयकुमार जोशी , जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, प्रशांत नेटके,राहुल घुळे ,सरपंच विश्वंभर सुरवसे,उपसरपंच युवराज यादव ,ग्रामपंचायत सदस्य नितीन कवठाळे,जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक , गावातील सर्व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.