लातुर :- दिनांक २५,०५,२०२१ ते २६.०५.२०२४ या कालावधीत मराठवाड्यातील सर्व जिल्हयामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वा-यासह अवेळ पाऊस व गारपीट होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत . करीता आपले नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवून दर तासांनी पडणा - या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्याबाबत संदेश या कार्यालयास द्यावा . व सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्व शेतकरी । नागरीक यांनी खबरदारी घ्यावी . ( १ ) विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे . ( २ ) शेतक - यांनी दुपारी 03.00 ते 07.00 या वेळेत शेतीची व इतर कामे करु नयेत कारण सदर कालावधीमध्ये विज्ञा पडण्याची शक्यता जास्त असते . ( ३ ) दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली । पाण्याच्या स्त्रोताजवळ / विदयुत खांबाजवळ बांधू नयेत , त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत . ( ४ ) आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करून स्वतः सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा . ( ५ ) पाऊस सुरु असताना विजेच्या तारा । जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते . तरी त्यापासून दुर राहण्याची खबरदारी घ्यावी . अशा सुचना आपल्या अधिनस्त पोलीस अधिकारी | तलाठी । मंडळ अधिकारी | ग्रामसेवक / सरपंच / कृषी सहाय्यक यांचे व्दारे निर्गमित करुन आपण आपल्या तालुक्यातील गावाना सावधगीरीची सूचना देवून योग्य ती उपाययोजना करावी व तसा अनुपालन अहवाल या कार्यालयास सादर करावा . सदरच्या कालावधीत कोणीही आपले मुख्यालय सोडू नये . असे आदेश लातूर अप्पर जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.