रेवडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना न्यायालयाची चपराक, गुन्ह्यातील 6 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.*


*रेवडीसीवीर  इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना न्यायालयाची चपराक, गुन्ह्यातील 6 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.*

लातूर प्रतिनिधी





            या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, बहुचर्चित रेवडीसीवीर  इंजेक्शनचा काळाबाजार बाबत पोलीस ठाणे एमआयडीसी येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासात सहा आरोपींना अटक करून मा.न्यायदंडाधिकारी,न्यायालय-2,लातूर येथे हजर करण्यात आले होते. नमूद गुन्ह्यातील आरोपीतानी जामीन मिळवण्यासाठी मा.न्यायालयात जामीनअर्ज केला होता. मा. न्यायाधीश श्री.एस.बी. शेख यांनी सर्व आरोपीताचा जामीन अर्ज फेटाळला आहे. 

            मा.न्यायालयाचा हा निर्णय  covid-19 च्या आजच्या गंभीर परिस्थितीत जीवनाशक्य वस्तूचा चोरटा,अवैध विक्री/व्यवसाय करणाऱ्यांना मोठी चपराक आहे.सरकारी पक्षातर्फे MIDC पोलिसांनी,कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी व एड.श्री.शिवकुमार जाधव यांनी भक्कम बाजू मांडली असल्याने नमूद आरोपीताचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे . गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक कराड व त्यांची टीम करत आहे.

          जीवनाशक्य वस्तूचा काळाबाजार करू नये. जो कोणी जीवनाशक्य वस्तूंचा काळाबाजार करेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव यांनी म्हंटले आहे.

न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळलेल्या आरोपीची नावे.


1)ऋषिकेश माधव कसपटे रा. वाल्मिकी नगर, लातूर

2) शरद नागनाथ डोंबे रा.विकास नगर, लातूर

3)ओम सुदर्शन पुरी रा.एकूरगा

4)सिद्धेश्वर राजेंद्र सुरवसे राजेंद्र.नंदी स्टॉप ,लातूर

5)किरण भरत मुदाळे रा. नंदी स्टॉप,

6) अतुल केंगार राहणार ,लातूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या