*लसीकरणाची गर्दी टाळण्यासाठी गावनिहाय व प्रभागनिहाय लसीकरण करावे.*
लातुर: दि. ८ - कोरोना आजार वाढू नये, व त्या आजाराला रोखण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती वाढवण्याकरीता आणि जनतेला कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण देण्यासाठी शासनामार्फत सर्वत्र लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. सध्या हे लसीकरण संपूर्ण लातूर जिल्ह्यात ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी चालू आहे. मात्र या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र गर्दी होत असल्यामुळे हे लसीकरण गावनिहाय व प्रभागनिहाय केले जावे अशी मागणी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
गावनिहाय लसीकरणाची आखणी करीत असताना जी गावे मोठी आहेत त्याठिकाणी प्रभागनिहाय लसीकरण करण्यात यावे. हरंगुळ (बु.) सारखे दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात केवळ उपकेंद्रावर लसीकरण ठेवून चालणार नाही. तर विकासनगर, गोविंदनगर, वसवाडी, माऊलीनगर, समर्थनगर, मंदार, आणि गावभाग या सर्व भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत किंवा सार्वजनिक सभागृहामध्ये हे लसीकरण तारखा जाहीर करून करण्यात यावे. अशीही मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे. लसीकरणाला होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीन वाढु नये, त्याकरिता गावनिहाय व प्रभागनिहाय लसीकरणाची योजना करावी अशी मागणी व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.