68469 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले
नवीन 957 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
29 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
लातूर, दि.9, (प्रतिनिधी) - लातूर जिल्ह्यातील 68469 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 957 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1557 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 261 अहवाल प्रलंबित आहेत. 328 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या प्रलंबित मधील 100 पॉझिटिव्ह आले आहेत. 2262 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 529 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 80992 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 10968 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1555 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 68469 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1081 आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.