वृत्त क्र.371
*सर्व तहसीलदार यांनी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्के पेक्षा कमी येण्यासाठी प्रयत्न करावेत*
*प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात 5 व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता ठेवावी*
*जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत च्या सर्व डॉक्टर्सना व्हेंटिलेटर चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात यावे*
*ग्रामीण रुग्णालयात कोविडचे चांगले काम करणाऱ्या डॉक्टर्सना पुरस्कार देण्यात येणार*
*प्रत्येक तालुक्यात कोविड-19 चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी*
*एकाच गावात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्यास त्या गावांची मास टेस्टिंग करून घ्यावी*
*येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी करून ठेवावी*
*कोरोनाच्या अनुषंगाने महापालिकेने स्वतःची आरोग्य यंत्रणा उभी करावी*
*जिल्ह्यातील सर्व नगरपंचायती मध्ये तिसऱ्याला त्याच्या अनुषंगाने उत्कृष्ट आरोग्य सुविधा निर्माण कराव्यात*
*तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने शासकीय व खाजगी रुग्णालयांनी बालकांसाठी व्हेंटिलेटर ची उपलब्धता ठेवावी*
*म्युकरमायसोसिस आजारावरील औषधांचा पुरवठा योग्य पद्धतीने करावा*
*कोविडच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यावी*
लातूर, दि.27(जिमाका):- जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दहा टक्के पेक्षा खाली आलेला आहे. परंतु काही तालुक्यांचा पॉझिटिव्हिटी रेट हा दहापेक्षा अधिक आहे. त्यामुळे सर्व तहसीलदार यांनी त्यांच्या तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी येण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे असून प्रत्येक तालुक्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी व पुढील शंभर दिवस कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा कोरुना आढावा बैठकीत पालकमंत्री अमित देशमुख बोलत होते. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार धीरज देशमुख, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे महापालिका आयुक्त अमान मित्तल, महापालिकेचे विरोधी पक्षनेते ॲड. संभाजी सूळ, निवासी उप जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास, आय. एम. ए. अध्यक्ष डॉक्टर सुनिता काळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री अमित देशमुख पुढे म्हणाले, की लातूर जिल्ह्यात कोरोना ची संख्या कमी होत असून जिल्ह्याचा पॉझिटिव रेट 10 टक्के पेक्षा कमी झालेला आहे. परंतु काही तालुक्यांचा पॉझिटिव्हटी रेट दहा टक्क्यांपेक्षा अधिक असून या तालुक्यांनी कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून जास्तीत जास्त संशयीत रुग्णांची तपासणी करावी. एखाद्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्या गावातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करावी. पॉझिटिव्हिटी रेट कमी करण्याचे प्रयत्न करावेत असे त्यांनी सुचित केले.
आरोग्य विभागाने येणाऱ्या संभाव्य कोविड च्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात पाच व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता ठेवावी. त्यामुळे लातूर शहरातील आरोग्य यंत्रणेवर ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांचा ताण वाढणार नाही. तसेच हे व्हेंटिलेटर चालविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्यांच्याकडील डॉक्टर्स उपलब्ध करून द्यावेत. या डॉक्टर्सना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने व्हेंटिलेटर चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
या लाटेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने स्वतःची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करावी. लातूर जिल्ह्यात बालरोग तज्ञांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणेने एकत्रित येऊन संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन बेड मोठ्या प्रमाणावर उपलब्धता करून ठेवावी. जिल्हा प्रशासन या लाटेच्या अनुषंगाने ज्या आवश्यक आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करावयाच्या आहेत त्या करून ठेवाव्यात तसेच मोठ्या प्रमाणावर आवश्यक औषधे चा उपलब्ध करून ठेवावी असेही पालक मंत्री देशमुख यांनी सूचित केले.
जिल्ह्यातील सर्व नगरपंचायती मध्ये कोविडच्या अनुषंगाने आरोग्य सुविधांचा आढावा घ्यावा व ज्या नगरपंचायती मध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ज्या सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे त्याची पूर्तता त्वरित करावी असे निर्देश श्री देशमुख यांनी दिले. म्युकर मायसिस आजाराच्या रुग्णांची नोंदणी प्रशासनाने ठेव येऊन त्या रुग्णांना वेळेत आवश्यक औषधी पुरवठा करावा असेही त्यांनी सूचित केले.
आरोग्य यंत्रणेच्या अंदाजानुसार ऑक्टोबर. नोव्हेंबर 2021 या कालावधीत संभाव्य तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने योग्य ती तयारी करून ठेवावी. तसेच नागरिकांनीही योग्य ती काळजी घेतल्यास कोरोना च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास ही संभाव्य लाट लातूर जिल्ह्यात येणारच नाही अथवा आल्यास तिचा परिणाम कमी प्रमाणात राहील. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोरणाच्या नियमांचे पालन करावे असे आहवान पालकमंत्री देशमुख यांनी केले.
यावेळी आमदार विक्रम काळे आमदार धीरज देशमुख महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनीही कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल व आयुक्त मित्तल यांनीही मार्गदर्शन केले.
प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख यांनी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड हेल्थ सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची माहिती बैठकीत दिली. माहे मार्च 2021 मध्ये जिल्ह्यात 8456 कोरणा बाधित रुग्ण आढळले तर माहे एप्रिल 2021 मध्ये हीच संख्या 39 हजार 349 इतकी झाली. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण झाला होता. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे असे त्यांनी सांगितले.
तसेच आजपर्यंत 2032 कोरोना रूग्णांचे मृत्यू झालेला असून मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत असल्याचे डॉक्टर देशमुख यांनी सांगून लातूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने होत असल्याचे सांगून ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजन बेड निर्माण केल्याची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे 13 प्लांट चे काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होतील लातूर जिल्ह्याच्या ऑक्सिजनची गरज यातून भागवली जाणार असल्याची माहिती डॉक्टर देशमुख यांनी देऊन म्युकर मायसोसिस आजाराचे 136 रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 91 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत या आजारावरील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र वार्ड निर्माण केल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच यावरील उपचारासाठी आवश्यक इंजेक्शनचा पुरवठा केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याप्रमाणेच संभाव्य येणारी कोविडची तिसरी लाट बालकांना अधिक धोकादायक असल्याने त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आरोग्य यंत्रणा तयारीला लागल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना ची सत्य परिस्थिती व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची माहिती डॉ. परगे यांनी दिली तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोना वरील उपचार व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती अधिष्ठता डॉ. देशमुख यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.