*महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ निलंगा तालुक्याच्या वतीने ग्रामीण भागातील गरजूंना मास्क,सॅनिटाईझरचे वाटप*
लातुर प्रतिनिधी;-
निलंगा ;-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.टी.आंबेगावे यांच्या प्रेरणेने व लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे,व्यंकट पन्हाळे लातूर महिला जिल्हाध्यक्षा वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ निलंगा तालुक्याच्या वतीने 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील गरजूंना, मास्क व सॅनिटाईझर चे वाटप करण्यात आले.व संचारबंदीचे नियम पाळा विनाकारण बाहेर फिरू नका, सतत मास्क चा वापर करा ,वारंवार हात स्वच्छ धुवा असे जनजागृती करण्यात आली.यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे निलंगा तालुका अध्यक्ष द्रोणाचार्य कोळी,शेषेराव कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य जगदीश सुर्यवंशी, कैलास लामतुरे, यांची उपस्थिती होती.कोविड 19 चा ग्रामीण भागात वाढता पादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण परिसरात मास्कचा अत्यल्प वापर होत असल्याचे पाहूनच जनजागृती व मास्क,सॅनिटाईझर चे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्रातील सतत सामाजिक उपक्रमशील कार्य करणारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, लातूर जिल्ह्यातील 35 कोविड योद्ध्यांचा सन्मान असो ,फूटपाथवर राहणाऱ्या गरिबांना अन्नछत्र देने, पत्रकार, डॉक्टर,नर्स यांना मोफत प्रवास उपलब्ध करून देणे,आदिवासी भागात शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे अशा अनेक सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जनसामान्यांतून कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व तालुक्यात या संघाचे अनेक पदाधिकारी व सदस्य विस्तारलेले असून सतत अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.या उपक्रमशील कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डी.टी आंबेगावे ,राज्य कोष्याध्यक्ष लक्ष्मण कांबळे,लातूर जिल्हा अध्यक्ष लहूकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली पाटील, जिल्हा संघटक संजय राजूळे, जिल्हा समन्वयक सुनील बरुरे, जिल्हा संपर्क प्रमुख नितीन भाले ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा महिला संघटक छाया गुनाले, जिल्हा युवा अध्यक्ष सुनील कांबळे, युवा उपाध्यक्ष रवी बिजलवाड व सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी आणि सभासद यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.