"मी लस घेतली,.... आपणही लस जरुर घ्या". आ,पवार यांची जनतेला आवाहन
औसा प्रतिनिधी
मुख्तार मणियार
दि, 30 एप्रिल 2021 रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी कासार बालकुंदा, ता निलंगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. मानव जातीपुढे उभ्या ठाकलेल्या २१ व्या शतकातील सगळ्यात मोठ्या संकटातून जगाला मुक्त करण्याचे काम भारतात निर्माण झालेल्या २ लसी करत आहेत ही अभिमानाची बाब आहे. लस संपूर्णतः सुरक्षित असून देशात आणि देशाबाहेर मिळून जवळपास १८-२० कोटी नागरिकांना भारतीय लसीचा डोस घेतला आहे. आज पासून १८ वर्षांपुढील तरुण मित्र सुद्धा लसीकरणासाठी पात्र होणार आहेत. लसीची जशी जशी उपलब्धता होईल तशी प्रत्येकाने लस घ्यावीच पण आपल्या कुटुंबातील ४५ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण मात्र प्राधान्याने करून घ्यावे असे आमदार अभिमन्यू पवार यांनी जनतेला आवाहन केले,
कासार बालकुंदा येथील कोरोना स्थितीचा व लसीकरणाचा यावेळी आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने तहसीलदार श्री गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते व भाजप पदाधिकारी नितीन पाटील उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.