लातूर जिल्हयात १०० दिवसात लसीकरण मोहिम पूर्ण करायचे नियोजन सादर करावे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख

 

लातूर जिल्हयात १०० दिवसात लसीकरण मोहिम

पूर्ण करायचे नियोजन सादर करावे

पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख





Ø  जिल्हयात १०० दिवसात लसीकरण मोहिम पूर्ण करायचे नियोजन सादर करावे

Ø  शासकीय तसेच खाजगी रूग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट करावे

Ø  सर्व रूग्णालयातील अग्निशमन यंत्रणा तपासून घ्यावी

Ø  रेमडीसीवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा

Ø  दसऱ्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी

Ø  २५ पेक्षा जास्त रूग्ण असलेल्या गावात विलगीकरण केंद्र उभारावे

Ø  जिल्हयातील लातूर व इतर शहरातील कोवीड तपासणी वाढवावी

Ø  कोवीड तपासणीचा अहवाल लवकरात लवकर मिळण्याची व्यवस्था उभारावी

Ø  एमआयएमएसआरच्या वैदयकीय महाविदयालयाच्या रूग्णालयात क्षमते प्रमाणे कोवीड१९ रूग्णसेवा घडावी बैठकी दरम्यान आदी सुचना देऊन ऑक्सिजन, औषधे व लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन या बैठकी दरम्यान दिले.

 

लातूर प्रतिनिधी : १ मे :

     लातर जिल्हयात १०० दिवसात लसीकरण मोहिम पूर्ण करायचे नियोजन सादर करावे, शासकीय तसेच खाजगी रूग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट करावे, सर्व रूग्णालयातील अग्निशमन यंत्रणा तपासून घ्यावी, रेमडीसीवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा, दसऱ्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी आदी निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.

  कोवीड१९ प्रादूर्भावाच्या पार्श्वभुमिवर दुसऱ्यांदा लागू झालेला लॉकडाऊन, बाधीत रूग्णावरील उपचार, औषधे व ऑक्सिजनचा पुरवठा, १८ वर्षावरील वयाच्या जनतेसाठी सुरू होत असलेली लसीकरण मोहिम या अनुषंगाने लातूरचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी शनिवार दिनांक ०१ मे रोजी सकाळी शासकीय विश्रामगृह, लातूर येथे लोकप्रतिनिधी, वरीष्ठ अधिकारी, आयएमए पदाधिकारी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. यावेळी मनपा महापौर विक्रांत गोजमगुंडे, ॲड. दीपक सूळ, जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संजय ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक महादेव बनसुडे, आयएमएचे प्रतिनिधी डॉ. अशोक गानु, डॉ.अशोक पोद्दार, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. राहुल सुळ, डॉ. बालाजी बरुरे यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री ना. देशमुख यांनी जिल्हयातील कोवीड१९चा प्रादूर्भाव बाधीत रूणावरील उपचार, औषधे, ऑक्सिजन इतर वैदयकीय साहित्यांची उपलब्धता, रूग्णसंख्या आणि रूग्णालयातील बेडची उपलब्धता. लॉकडाऊनची अंमलबजावनी, जनतेच्या अडीअडचणी यांच्या संदर्भाने माहिती करून घेतली, आयएमएच्या सदस्यांनीही व्हेन्टिलेटरची उपलब्धता, रूग्णालयातील कचरा व्यवस्थापन, अग्निशमन व्यवस्था या अनुषंगाने माहिती देऊन खाजगी रूग्णालयातील उपचार व अडचणी संदर्भात माहिती दिली.

  पहिल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परीणाम दिसत असल्यामुळे दुसऱ्या लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावनी करावी, ग्रामिण भागात प्रादूर्भाव वाढू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी, जिल्हयात १०० दिवसात लसीकरण मोहिम पूर्ण करायचे नियोजन सादर करावे असे निर्देश बैठकी दरम्यान पालकमंत्री ना. देशमुख यांनी दिले आहेत. २५ पेक्षा जास्त रूग्ण असलेल्या गावात विलगीकरण केंद्र उभारावे, शासकीय तसेच खाजगी रूग्णालयातील ऑक्सिजन वापराचे ऑडीट करावे, सर्व रूग्णालयातील अग्निशमन यंत्रणा तपासून घ्यावी,रेमडीसीवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळावा, दसऱ्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावनी करावी, २५ पेक्षा जास्त रूग्ण असलेल्या गावात विलगीकरण केंद्र उभारावे,जिल्हयातील लातूर व इतर शहरातील कोवीड तपासणी वाढवावी, कोवीड तपासणीचा अहवाल लवकरात लवकर मिळण्याची व्यवस्था उभारावी, एमआयएमएसआरच्या वैदयकीय महाविदयालयाच्या रूग्णालयात क्षमते प्रमाणे कोवीड१९ रूग्णसेवा घडावी बैठकी दरम्यान आदी सुचना देऊन ऑक्सिजन, औषधे व लस पुरेश्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन या बैठकी दरम्यान दिले.

ऊदगीर येथे ऑक्सिजन प्लांट

  ऊदगीर येथील रूग्णालयासाठी ऑक्सिजनची वाढत असलेली मागणी आणि वाहतुकी दरम्यान येत असलेल्या अडचणी लक्षात घेता विलास सहकारी साखर कारखाना युनीट क्रमांक २ येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारणे शक्य आहे का याची शक्यता तपासून पहावी अशी सुचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या. ५० पेक्षा जास्त बेड असलेल्या सर्वच शासकीय व खाजगी रूग्णालयाच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारणे  आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

*********

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या