कुठे आहेत लातूरचे खासदार ?
लातूर (शेख मुस्तफा ) :- कुठे आहेत लातूरचे खासदार सुधाकर क्षृंगारे असा सवाल आजकाल सर्व लातूरवासियांना पडला आहे. आमदार व पालकमंत्री या नात्याने पालकमंत्री आपली जवाबदारी घेत आहेत मधूनच का होईना ते एखाद दुसरी बैठक घेऊन कोरोनावर विजयी होण्याचा संकल्प ते करीत आहेत पण या सर्व धाकधुकीमध्ये लातूरचे प्रचंड बहुमतांने विजयी झालेले आमचे लाडके खासदारांचे काही दर्शन होईनासे झाले आहे कारण कोरोनाची जेव्हापासून दुसरी लाट आली आहे ते कुठे आहेत हे कळायला मार्गच नाही कारण त्यांची एक ही आढावा बैठक झाली नाही. किंवा कोव्हिड सेंटरला भेट नाही मग ते कुठे आहेत असाच प्रश्न उपस्थित करावा लागेल.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने पुर्ण देश होरपळून निघत आहेत लोक ऑक्सीजन अभावी मरत आहेत व लातूरातील ताजी घटना म्हणजे व्हेंटीलेटर नसल्यामुळे कोरोना पेशंटचा रुग्णालयाच्या दारात मृत्यु झाला तरी पण लातूरच्या खासदाराचे एकही स्टेटमेंट किंवा सुचना येत नाही हे नवलच म्हणावे लागेल? खासदार म्हणजे जिल्ह्याचा केंद्र सरकारचा प्रतिनीधी तसे पाहता ते पद अतिशय महत्वाचे असते कारण केंद्र सरकारसोबत लढून जिल्ह्यातील आवश्यक बाबी पूर्ण करु शकतात पण खासदारांनी निष्क्रीय राहूण्याचा ठरवलेले दिसत आहेत तर मग कोणी काय करील? पण आता लातूरातील जनता त्यांना विचारत आहेत कारण लातूरातील जनतेने त्यांना निवडूण दिलेले आहेत त्यामुळे आता त्याना जनतेसमोर यावेच लागेल आणि त्यांच्या समस्या ऐकाव्याच लागतील.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.