*जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री
अमित देशमुख यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण संपन्न*.
*जिल्हा पोलिस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनांचे वितरण*
लातूर,दि.१(जिमाका):-महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या शुभ हस्तें आज सकाळी 8.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधिक्षक निखील पिंगळे, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महानगर पालिका आयुक्त अमन मित्तल हे उपस्थित होते. हा कार्यक्रम covid-19 च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे संपन्न झाला.
त्यानंतर जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर यांना जिल्हा पोलिस दलासाठी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहन वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री. देशमुख यांनी 51 दुचाकी व 28 चार चाकी वाहनास हिरवा झेंडा दाखवून या वाहनांचे लोकार्पण केले.
*******
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.