महात्मा बसवेश्वरांची कोरोनाच्या सावटाखाली घराघरात जयंती साजरी
लातूर ः महात्मा बसवेश्वरांची 916 वी जयंती ही आज कोरोनाच्या पार्श्वभुमीवर व लॉकडाऊनच्या सावटाखाली साधेपणाने साजरी करण्यात आली. लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी लिंगायत समाज बांधवांना कोरोनामुळे महात्मा बसवेश्वरांची जयंती घरातच साजरी करावी असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे समाजबांधवांनी जयंती घरातच साजरी केली.
बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी केलेले कार्य जगासाठी मार्गदर्शक आहेत. समता, मानवता, कायक आणि दासोहावर आधारित त्यांचे तत्वज्ञान आजही आपणास खुप उपयोगी पडते. बाराव्या शतकात त्यांनी निर्माण केलेले अनुभवमंटप आज जगातील पहिली संसद म्हणून समोर आली आहे. ही गोष्ट तमाम भारतीयांच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. आज महात्मा बसवेश्वरांच्या स्मृतीला उजाळा देण्याचा दिवस असून त्यांच्या पावलावर चालण्याची प्रतिज्ञा घेण्याचा दिवस असल्याचे प्रतिपादन लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी केले.
लिंगायत महासंघाने जयंती साधेपणाने साजरी केली व लातूरातील महात्मा बसवेश्वरांच्या दोन्ही पुतळ्यांना अभिवादन केले. याप्रसंगी लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ.काशिनाथ राजे, माणिक कोकणे, विजयकुमार कुडूंबले, रमेश वेरूळे यांनीही अभिवादन केले. तसेच प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी पहिल्यांदा आपल्या घरीच महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली. यावेळी त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.