उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर व त्यांचे विशेष पथकाची धडाकेबाज कामगिरी


उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर व त्यांचे विशेष पथकाची धडाकेबाज कामगिरी



दि. २५/०५/२०२१ रोजी श्री जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर हे रात्रगस्तीचे नियोजन व मार्गदर्शन करीत ऑफिसमध्ये बसले असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाले वरुन उपविभगीय पोलीस अधिकारी श्री जितेंद्र जगदाळे व त्यांचे विशेष पथकातील सफो/बहिद शेख, पोह/६४२ आर बी डगे, पोना/१३० पारडे, तसेच गांधी चौक, पोलीस स्टेशनचे पोउपनि/कव्हाळे, पोना/ १७० शिंदे, पोना/१७२७ बेसके यांना सोबत घेवून सिध्देश्वर मंदिरचे उत्तर कंम्पाऊंड लगत दरोडा टाकण्याची तयारी करत अंधारात बसलेले होते. आमची चाहूल लागताच दोघेजण कंपाऊंड वरुन उडयामारुन पळू लागले, त्यांचा पाठलाग केला असता ते अंधाराचा फायदा घेत तेथून पळून गेले. आम्ही तिघांना जागीच पकडून त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव क.१ अजिंक्य निळकंठ मुळे वय २४ वर्ष रा. उत्का ता. औसा हमु जुना ओसा रोड, लातूर क्र. २ विश्वजीत अभिमन्यू देवकते वय २० वर्षे, रा. कातपुर ता.जि. लातूर क्र.३ गणेश महादेव माने वय १९ वर्षे, रा. खोरी गल्ली, लातूर त्यांची झडती घेतली असता त्यापैकी अजिक्य मुळे यांचेकडे एक तलवार विश्वजीत देवकते याचेकडे एक लोखंडी रॉड व गणेश माने याचे खिशात मिरची पावडर मिळून आले. त्यांना पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारता त्यांची नावे क्र. १ सुनिल विठठल भोसले रा राजे शिवाजी नगर, वसवाडी लातूर क्र. २ निलेश काळे रा. शिरुर अनंतपाळ हमु खडेकर स्टॉप, लातूर असे सांगितले. त्यावरुन श्री जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांचे फिर्याद वरुन पो.स्टे गांधी चौक, लातूर गु.र. नं. २९९/२०२१ कलम ३९९, ४०२, १८८, २६९ २७० भा.दं.वि व कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे तसेच कोव्हिड १९ प्रतिबंधक अधिनियम २,३,४ प्रमाणे वरील ०५ आरोपीता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वरील ०५ ही गुन्हेगार सराईत असून त्यांनी लातूर शहरात व इतर ठिकाणी माला विषयी व शरीराविषयी बरेच गुन्हे केलेले आहेत.


दि. २६/०५/२०२१ रोजी मा. श्री जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांचे आदेशावरुन विशेष पथकातील सफो/ वहिद शेख, पोह/ ६४१ रामचंद्र ढगे, पोना/ १३० महेश पारडे, व पो.स्टे गांधी चौक, लातूर येथील पोना / १७० दत्ता शिंदे, पोना/ १७२७ बेस्के, असे मिळून पो.स्टे गांधी चौक, लातूर गु.र.नं. २९९/२०२१ मधील दरोडयातील फरार आरोपी सुनिल भोसले व निलेश काळे यांचा शोध घेत राजेशिवाजी नगर, लातूर येथे गेले असता तेथे सुनिल विठठल भोसले हा मोटार सायकलसह मिळून आला त्यास पकडून मोटार सायकलची विचारपुस केली असता त्याने दोन दिवसापूर्वी मी व माझे इतर चार साथीदार सिध्देश्वर मंदिर येथे चोरी करण्यासाठी बसलो होतो. पोलीसांना पाहून तेथून मी व निलेश काळे पळून गेलो व त्याच रात्री मजगे नगर, लातूर येथे जावून एका घरा समोरुन मी वापरत असलेली मोटार सायकल चोरुन आणलेली असल्याचे सांगितले. त्याची खात्री केली असता पोलीस स्टेशन गांधी चोक, लातूर येथील गु.र.नं. ३०२/२०२१ कलम ३७९ भा.द.वी मधील चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर मोटार सायकल जप्त करून त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने लातूर शहरातील टयूशन भागात, दयानंद कॉलेज गेट, प्रकाश नगर, लातूर येथे दुकानचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन आतील रोख रक्कम व मोबाईल चोरी केल्याचे व इतर बरेच मोबाईल चोरी केल्याचे सांगितले आहे. सदर मोबाईल बाबत अधिक तपास चालू आहे. सदर आरोपी पो.स्टे गांधी चौक, लातूर येथे मोटार सायकलसह हजर केले आहे.


वरील कार्यवाही मा. निखील पिंगळे पोलीस अधिक्षक, लातूर, मा. हिंमत जाधव अपर पोलीस अधिक्षक, लातूर, यांचे मार्गदर्शना खाली श्री जितेंद्र जगदाळे उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर यांनी व त्यांचे विशेष पथकातील पोलीस अंमलदार सफो/ वहिद शेख, पोह/६४१ आर बी ढगे, पोना/ १३० पारडे, तसेच गांधी चौक, पोलीस स्टेशनचे पोउपनि/कव्हाळे, पोना / १७० शिंदे, पोना / १७२७ बेसके यांनी विशेष कामगीरी केली 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या