सामाजिक जाणिवेतून मुरळीकर परिवाराकडून ४८ कष्टकरी-गटई कामगारांना रेशनकिट वाटप

 

सामाजिक जाणिवेतून मुरळीकर परिवाराकडून
४८ कष्टकरी-गटई कामगारांना रेशनकिट वाटप






लातूर,दि.२२ःकोरोनामुळे लातूरमध्ये अनेक दिवसांपासून लागलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार थांबलेल्या १६ कष्टकरी आणि ३२ गटई कामगारांना मदत करण्याच्या भावनेतून पुढे येत बँक कॉलनी,विक्रम नगर ातील सेवा निवृत्त बँक अधिकारी,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा उपााध्यक्ष तथा बँक कर्मचारी सेना महासंघाचे जिल्हाध्यक्ष सी.के.मुरळीकर यांनी गुुरुवार,दि.२० मे रोजी प्रत्येकी हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करुन  सामाजिक उत्तरदायित्व पार पाडले आहे.
रोडवर बसून काम करणारे गटई कामगार आणि कष्टकर्‍यांचा रोजगार लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद पडल्याने त्यांचे जगणे जिकीरीचे झाले आहे,ही बाब लक्षात घेवून,सामाजिक बांधिलकी म्हणून,सेवानिवृत्त बँक अधिकारी सी.के.मुरळीकर  यांनी  चक्क आपल्या पेन्शनमधील पैसे काढून लातूरातील ३२ गटई कामगार  व १६ कष्टकर्‍यांसाठी हजार ते बाराशे रुपयंाच्या   जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून,कोरोनाचे नियम पाळून ते किट,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शहर प्रमुख रवी कुरील,राज्य कार्यकारी सदस्य अनिल कबाडे, जिल्हा मार्गदर्शक शिवाजी दामावले,राष्ट्रीय चर्मकार शिक्षक महासंघ शिक्षक आघाडीचे जिल्हा प्रमुख डी.एस.उदबाळे हस्ते,समाज बांधवांच्या उपस्थितीत गुरुवार,दि.२० मे २०२१ रोजी गरजूंच्या हवाली केले.
स्वतःच्या खिशात हात घालून मुरळीकरांनी गरीबांप्रती औदार्य दाखविले हा एक आदर्श आहे,अशा भावना यावेळी रवी कुरील,अनिल कबाडे, उदबाळे यांनी व्यक्त  केल्या.
हातावरची मजूरी थांबल्याने समाज बांधवांना मदत करणे आपली नैतिक जबाबदारी आहे,या भावनेतून आपण हा उपक्रम केल्याचे सी.के.मुरळीकर यांनी सांगून,समाजातल्या आर्थिक संपन्न घटकाने गरीबांना या संकटकाळी  हात द्यावा असे आवाहनही यावेळी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या