लातूर जिल्हयातील वृध्द निराधार अपंगासाठी
३३ कोटी ६६ लाख रूपयांचे विशेष सहाय अनुदान मंजूर
लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करीत लाभार्थ्यांना
कोणताही त्रास होणार नाही यांची दक्षता घेऊन् अनुदान वाटप करावे
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचे प्रशासनाला निर्देश
लातूर प्रतिनिधी : १३ मे :
कोरोना महामारीच्या काळात लातूर जिल्हयातील निराधार व वृध्द नागरीकांची हेळसाड, कुचंबना होवु नये म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लातूर जिल्हयासाठी ३३ कोटी ६६ लाख रूपयाचा निधी वर्ग केला असून त्यांचे वितरण लॉकडाऊनच्या नियमाला अनुसरून तातडीने करावे, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
कोवीड१९ च्या वाढत्या प्रादूभावाच्या पाश्वभुमीवर लॉकडाऊन लागू करीत असतांना राज्यातील मजूर, रीक्षा चालक या घटकासोबतच निराधारांनाही मदत करण्याचे धोरण महाविकास आघाडी सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले होते. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा वेतन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग योजना यासाठी शासनाने अर्थसहाय जाहीर केले आहे. यामध्ये लातूर जिल्हयासाठी एकुण ३३ कोटी ६६ लाख २४ हजार ६६६ रूपये वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये लातूर तालुका १३ कोटी २८ लाख ६४ हजार, अहमदपूर २ कोटी १९ लाख ५२ हजार ६००, औसा ४ कोटी १२ लाख २९ हजार ८००, चाकूर १ कोटी १५ लाख ७८ हजार, निलंगा ४ कोटी १२ लाख ७९ हजार २००, रेणापूर २ कोटी ४३ लाख १ हजार, ऊदगीर १ कोटी ६६ लाख ९४ हजार, शिरूरअंनतपाळ १ कोटी ७५ लाख ८३ हजार ८००, जळकोट १ कोटी ४ लाख ९२ हजार आणि देवणी तालुक्यासाठी १ कोटी ८६ लाख ५० हजार ३०० रूपये आता तालुक्याच्या ठिकाणी वर्ग करण्यात आले आहेत.
विशेष सहाय योजनेतून मंजूर झालेल्या या रकमेचे वितरण करण्याचे नियोजन तालुकास्तरावरून करण्यात यावे, लॉकडाऊनच्या पार्श्वभुमिवर निराधार, अपंग यांना अनुदान मिळवण्यासाठी धावपळ करावी लागू नये त्यांची एका ठिकाणी गर्दी होणार नाही यासर्व गोष्टींची दक्षता घेत संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे पदाधिकारी व सदस्य, तसेच प्रशासन व बॅकेने सदरील मदतीचे वाटप करावे, असे निर्देश लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.