सुदर्शन टी.व्ही. चॅनेलची मान्यता रद्द करून निवेदकावर कारवाई करा
केज (प्रतिनिधी):- इस्लाम धर्माचे महत्वपुर्ण आदरस्थान असलेल्या मदिना मुनव्वरा मस्जिद बाबत सुदर्शन टी.व्ही. चॅनेल ने आक्षेपार्ह आणि इस्लाम धर्मीय मुस्लिमांच्या भावना दुखावणारे खोडसाळ दृश्य प्रसारित केल्याने तसेच या टी.व्ही. चॅनल कडून यापूर्वीही अनेकदा इस्लाम आणि मुस्लिमांबदल गरड ओकणारे वृत सातत्याने प्रसारित केले जात असल्याने या चॅनेलची मान्यता रद्द करून निवेदक सुरेश चव्हाणकेवर कडक कारवाई करण्याची मागणी एआयएमआयएम चे केज शहराध्यक्ष तालेब (भैय्या) इनमादार यांनी तहसील कार्यालय मार्फत देशाच्या सूचना आणि प्रसार मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे कि, संपूर्ण जगात इस्लाम धर्मासाठी अत्यंत महत्त्वाची, आस्थेची, आदराची दोन स्थाने आहेत यात पहिल्या क्रमांकावर मक्काह मुनव्वरा आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर मदिना मुनव्वरा आहे. याच मदिना मुनव्वरा मशिदीवर काही रॉकेटने हल्ला करून मदिना मस्जिद व मिनार उध्वस्त करत असल्याचे व्हिडिओ चित्रण केलेली चित्रफीत सुदर्शन टी.व्ही. चॅनल वर दाखविण्यात आली आहे. हे कमी होते की काय म्हणून इस्लाम धर्म आणि मुस्लिमांविषयी निवेदक सुरेश चव्हाणके याने गरड ओकली आहे. यामुळे इस्लाम धर्मीय मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून सुदर्शन टी.व्ही. चॅनल आणि निवेदक सुरेश चव्हाणके बद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मंत्री महादेय, हे लक्षात असू द्यावे की, आपल्या
भारत देशात शतकानुशतके हिंदू- मुस्लिमसह इतर धर्माचे अनुयायीही गुण्यागोविंदाने राहतात. तरीही सुदर्शन टि.व्ही. चॅनल हे नेहमी इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाविषयी गरड ओकणारे वृत आणि व्हिडिओ प्रसारित करीत असतो. सातत्याने हिंदु- मुस्लिम समाजात दुही निर्माण करून विष कालवण्याचे प्रयत्न करीत असतो. तरीही या चॅनेलवर सूचना आणि प्रसार मंत्रालय कोणतीही कारवाई करत नाही. यामुळे सुदर्शन टी.व्ही. चॅनल ची आणि निवेदक सुरेश चव्हाणके ची जातीयवादी हिम्मत दिवसेंदिवस वाढत असून हे चॅनल आणि निवेदक सुरेश चव्हाणके हे आपल्या भारत देशाच्या एकतेला व अखंडतेला तडा निर्माण करू पाहत आहे.
यांच्याकडून देशाच्या एकसंधतेला आणि मानवतेला धोका आहे. हे वेळीच ओळखावे आणि सुदर्शन टि.व्ही. चॅनल ची मान्यता रद्द करावी. व निवेदक सुरेश चव्हाणके याच्यावर कठोर कारवाई करावी आणि हिंदू- मुस्लिम समाजाला न्याय द्दावा. अशी मागणी एआयएमआयएम केज शहराध्यक्ष तालेब (भैय्या) इनामदार यांनी तहसील कार्यालय मार्फत सूचना आणि प्रसारण मंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली असून निवेदनावर तालेब (भैय्या) इनामदार यांच्यासह जावेद शेख सर, अजिम सय्यद, फेरोज पठाण, समिर शेख आदींची नावे व सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.