मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा शासन अध्यादेश मागे घ्या ,
लातूर जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर
लातूर प्रतिनिधी –
राज्य सरकारच्या विविध आस्थापना मधील मागासवर्गीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व संवर्गामध्ये व सर्व टप्प्यातील आरक्षणापासून वंचित करण्यात येत असल्याचा शासन अध्यादेश रद्द करण्यात यावा अशी मागणी लातूर जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग च्या वतीने करण्यात आली आहे.
या बाबतचे रीतसर निवेदन लातूर जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांना २१ मे रोजी सादर करण्यात आले. विशेष अनुमती याचिका (Special Leave Pitition) क्रमांक 28306/2017 मधील सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयास अधिन राहून मागासवर्गीय अधिकारी/कर्मचा-यांना पदोन्नतीच्या कोटयातील रिक्त पदे भरतांना सर्व टप्प्यांना/संवर्गांना आरक्षण लागू करणे यासह अन्य महत्वपूर्ण बाबी लातूर जिल्हा कॉंग्रेस अनुसूचित जाती विभाग च्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात समाविष्ट करण्यात आल्या आहेत .
यावेळी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. बाबासाहेब गायकवाड, माजी नगराध्यक्ष श्री. लक्ष्मणजी कांबळे, जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री.प्रवीण सूर्यवंशी, माजी उपमहापौर श्री कैलास कांबळे, प्रा. सुधीर पोतदार यांची उपस्थिती होती.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.