भाजयुमोच्या वतीने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मोफत ऑटोरिक्षा सुविधा

 

भाजयुमोच्या वतीने लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मोफत ऑटोरिक्षा सुविधा




लातूर/प्रतिनिधी ः- कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण हेच एकमेव शस्त्र सध्या आहे. संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावे याकरीता प्रशासन व राजकीय पक्षांकडून जनजागृती होत आहे. त्याच अनुषंगाने ज्येष्ठ नागरीकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी त्रास होऊ नये याकरीता लातूर शहर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे यांच्या पुढाकारातून मोफत ऑटोरिक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अ‍ॅड. गोजमगुंडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाची नागरिकांनी मोठी धास्ती घेतलेली आहे. विशेषतः कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत तर संसर्गाने बाधीत होणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनापासून बचाव होण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय सध्यातरी उपलब्ध आहे. त्यामुळेच नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सातत्याने होत आहे. नागरीकांनी कोणतीही शंका उपस्थित न करता कोरोना लस घ्यावी याकरीता भाजपा व भाजयुमोच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. त्याचबरोबर लसीकरणासाठी जाणार्‍या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये याकरीता विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे यांच्या पुढाकारातून प्रभाग सहा मधील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी मोफत ऑटोरिक्षा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोफत ऑटोरिक्षाचे लोकार्पण करण्यात आलेले असून ही सुविधा भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे व भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात आली आहे. सदर सुविधेचे लोकार्पण करताना  अ‍ॅड. गणेश गोजमगुंडे यांच्यासह हावगीराव जवळगे, श्रीकांत गोजमगुंडे, प्रसाद लोकरे, रामभाऊ जवळगे, व्यंकटेश गोजमगुंडे, अक्षय यचवाड, बालाजी कोटलवार, शिवाजी धुमाळ, अभिमान घोडके, बालाजी हुलगुंडे आदींची उपस्थिती होती. सदर सुविधेसाठी मो. 9850207717, 9860074076 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या