सावधान कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय
म्हणून नियमांचे पालन करणे सोडू नका?
म्हणून नियमांचे पालन करणे सोडू नका?
सामाजिक कार्यकर्ते संजयजी राजुळे यांचे सर्व देशवासीयांना आवाहान
लातूर ः खुशखबर लातूरकरांनो कोरोनाची दुसरी लाट कमी होतेय, पण कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे जाणकारांकडुन सांगण्यात येत असल्याने आपण गाफील न राहता कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी सज्ज असायला हवे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने आपणा सर्वांना हे दाखवुन दिले कि कोरोना हा आजार थांबणारा नसून तो आणखी वाढणारा आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिथे कोरोनाविषयीची भिती होती त्या भितीनेच लोक घराच्या बाहेर पडत नव्हते. पण किती दिवस लोक हे घरात बसणार होते. त्यांना कधी ना कधी बाहेर पडायलाच हवे होते. सर्वजण कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर सर्व कांही व्यवस्थीत सुरळीत झाल्यानंतर लोक बाहेर पडले पण नियम धाब्यावर बसवून. त्यामुळेच कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेत कोरोना आजाराने मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पहायला मिळाले. सर्व हॉस्पिटल्स, आरोग्य कर्मचारी याकाळात परेशान झालेले पहायला मिळाले. सगळ्यांना नको-नकोसा वाटणारा लॉकडाऊन देशातील अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांना लावावा लागला. गेल्या दोन महिन्यापासून हा लॉकडाऊन कुठे कडक, कुठे शिथल अशा प्रमाणात लावण्यात आला असून अजुनही परिस्थिती गंभीरच असून कोरोना रूग्णांच्या रूग्णसंख्येत जरी घट होत असली तरी मृत्यूदर मात्र मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
आज आपल्याकडे कोरोनाविरूध्दच्या लढाईत व्हॅक्सीन आलेली आहे. जे कोणी नागरीक या व्हॅक्सीनचे दोन डोस घेतील त्याच नागरीकांना कोरोना आजारात दगावण्याचे प्रमाण कमी असणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. या व्हॅक्सिनच्या माध्यमातून आपण कोरोनावर मात करू शकणार आहोत. परंतू हि व्हॅक्सीन आपल्या देशाकडे मुबलक प्रामाणात नसल्याने सर्वत्र लसीसाठी बोंबबोंब सुरू असुन नागरीक हे लसीकरण करण्यासाठी सकाळपासून लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावत असल्याचे चित्र पहायला मिळाले. सुरूवातीच्या काळात जेंव्हा लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती नव्हती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रावर गर्दी नसल्याचे दिसून आले. परंतू लोकात जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली अन् भारतातीलच नागरीकांना लस देण्यासाठी कमी पडत असल्याने केंद्राने तात्काळ हि लस आपल्याच देशातील जनतेला देण्यासाठी प्राधान्य दिले. आपल्या देशाची लोकसंख्या हि मोठ्या प्रमाणात असून जगातील दोन नंबरची लोकसंख्या हि भारत देशाची असल्याने एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लसीकरण करणे सोपे काम नसल्याने भारत सरकार जी जानसे लसीकरण करण्याच्या तयारीत आहे. परंतू हे लसीकरण करतांना फार मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांना तोंड देत असतांनाच आणि दुसर्या लाटेचा प्रभाव कमी होतांनाचे चित्र असतांनाच आज देशात पुन्हा एकदा तिसर्या लाटेची चर्चा चर्चिली जात असून हि लाट केंव्हा येणार याचा कोणाला कांही थांगपत्ता नसून जाणकार मात्र या लाटेत मुख्यत्वेकरून लहान लेकरांवर या आजाराचा धोका होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी सर्वांनीच सजग राहायला हवे असून समाजाचा एक घटक म्हणून समाजातील सर्व यंत्रणांनी कोटेकोर नियमांचे पालन करून पहिल्या लाटेसारखे गाफील न राहता दुसर्या लाटेत आपण सजग राहून कोरोना महामारीवर मात करून चांगल्या प्रकारे लढा दिलेला आहे. आता हि लढाई तुमच्या घरातील लहान मुला-मुलींपर्यंत येणार असल्याने एक सजग पालक म्हणून आपण आपल्या पाल्यांपर्यंत हा रोग पोहचणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासनाने या कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी मोठ्या प्रमाणात बालरोग तज्ञांना सोबत घेवून टास्कफोर्स यंत्रणा तयार केली असून या टास्कफोर्सच्या माध्यमातून या तिसर्या लाटेला रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्यांना तयार करण्यात येणार असून त्यांना विशेष असे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या कोरोनाच्या लढाईत आजपर्यंत आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस कर्मचारी, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केलेले आहे. येणार्या काळातही ते अशाच प्रकारचे कार्य करत राहतील हि आशा बाळगु या अन् कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी आपण सर्वजण एकजुटीने सज्ज राहुया असे आवाहन लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी सर्व देशवासीयांना केले आहे.
आपला विश्वासू
संजयजी राजुळे
सामाजिक कार्यकर्ते, लातूर
मो.9923221900
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.