आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा
उद्योजक तसेच राजकीय पक्ष, संस्था व संघटना गणेश मंडळांना महापौरांचे आवाहन
लातूर/प्रतिनिधी
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शासकीय यंत्रणेवर प्रचंड निर्माण होत आहे. जिल्हा प्रशासकीय यंत्रणा, लातूर शहर महानगरपालिका आवश्यक त्या सर्व उपाययोजना करीत आहेत
ही स्थिती ओळखून विविध संस्था,
संघटना मदतकार्यात सक्रिय झालेल्या आहेत. भविष्यातील गरज व अडचण ओळखून विविध संस्था, राजकीय पक्ष, संघटना, गणेश मंडळे, उद्योजकांनी पुढाकार घेत रुग्णसेवेत आपलाही हातभार लावावा,आरोग्य सेवा बळकट करावी,असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
लातूर शहराला मोठा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास आहे.आपत्तीच्या काळात लातूरकर एकदिलाने त्यावर मात करतात.याचा अनुभव यापूर्वीही अनेकदा आलेला आहे.
कोरोना हीदेखील अशीच फार मोठी आपत्ती आहे. शासन व प्रशासन कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुमारे सव्वा वर्षापासून सुरू असणाऱ्या या आपत्तीत मदत म्हणून आजवर अनेक जण पुढे आले आहेत. काही संस्था, राजकीय पक्ष व संघटना तसेच सजग नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने रुग्णसेवा करत आहेत. कोणी रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी तर कोणी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी काम करत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांची निवास व भोजनाची सोयही अनेकजण करत आहेत. बाधित व त्यांच्या नातेवाईकांना मोफत प्रवासाची सुविधा अनेकांनी उपलब्ध करून दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने शासकीय यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे. त्यातच तिसऱ्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. अशा स्थितीत शहर व परिसरातील उद्योजक,विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संघटना,राजकीय पक्ष,गणेश मंडळे,तरुणांचे विविध गट यांनी आता रुग्णसेवेसाठी पुढे येण्याची गरज आहे.तिसरी लाट आलीच तर त्यावेळी आरोग्यसेवा अधिक मजबूत असणे आवश्यक आहे.अशा स्थितीत व्हेंटिलेटर्स,बाय पॅप
मशीन,ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर,एक्स-रे मशीन व इतर वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करता करून देता येऊ शकतात किंवा त्यासाठी आर्थिक मदतही देता येऊ शकते.
महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले की, महानगरपालिकेने अशी मदत स्वीकारण्यासाठी महानगरपालिका सीएसआर फंड या नावाने स्वतंत्र खाते निर्माण केले आहे.या खात्याचे सर्व अधिकार मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत.स्टेट बँक ऑफ इंडिया मधील या खात्याचा क्रमांक
६२२३७२४८१२५ हा असून आयएफएससी कोड SBIN००२०००३५ असा आहे.
संकटाचा काळ ओळखता विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष व गणेश मंडळांनी या लढ्यात सहकार्य करावे,असे आवाहनही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.
चौकट
महानगरपालिकेस थेट करता येईल मदत.
महानगरपालिकेने अशी मदत स्वीकारण्यासाठी महानगरपालिका सीएसआर फंड या नावाने स्वतंत्र खाते निर्माण केले आहे.या खात्याचे सर्व अधिकार मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत.स्टेट बँक ऑफ इंडिया मधील या खात्याचा क्रमांक
६२२३७२४८१२५ हा असून आयएफएससी कोड SBINOO20037 असा आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.