मे.चौधरी फर्टिलायर्झस वडवळ (ना) येथील रासायनिक
खत विक्री केंद्राचा परवाना निलंबित
लातूर,(जिमाका) दि.20:- जिल्हास्तरीय भरारी पथकाने मे.चौधरी फर्टिलार्झस वडवळ (ना) ता. चाकूर येथील खत विक्री केंद्राची तपासणी केली होती. तपसाणी दरम्यान डमी शेतकऱ्याला पाठवून जुने खत उपलब्ध आहे किंवा कसे व खताचे दर काय आहेत याबाबत चौकशी केली असता दि.1 एप्रिल 2021 पूर्वीचा खत साठ उपलब्ध असतानाही खत उपलब्ध नाही असे सांगीतले. व जूना खताचा साठा जास्तीच्या दराने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले यावरून खत नियंत्रण कायदा 1985 मधील खंड (3)3,35 (ए) जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3(2) चे उल्लघन केल्याचे दिसून आले त्यामुळे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर यांनी या केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.
जिल्हयात खरीप हंगाम 2021 साठी रासायनिक खते व बियाणाच्या खरेदीची शेतकऱ्यांकडून लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे व खते उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हयातील कृषि सेवा केंद्रची तपासणी कृषि केंद्राकडून सुरू आहे. यासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर एक अशा एकूण 11 भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. जूना खत साठा जादा दराने विक्री करत असल्याची तक्रार जिल्हास्तरावर प्राप्त झाली होती.
यापुढे जिल्ह्यातील कोणत्याही कृषि सेवा चालकांनी 1 एप्रिल 2021 पूर्वीचा खत साठा जादा दराने विक्री करणे,साठा रजिष्टर अद्यावत न करणे,खत उपलब्ध असतानाही नाही म्हणून ससांगणे, खताची लिंकिंग करणे इत्यादी चुका केल्यास खत नियंत्रण कायदा -1985 व जीवनाशयक वस्तू अधिनियन -1955 अन्वये कडक कार्यवाही करण्यात येईल,असे परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस.डी.गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
वृत्त क्र.351
रासायनिक खताचा वापर माती परिक्षणानुसार करावा
लातूर,(जिमाका) दि.20:-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा वापर माती परिक्षणानुसर करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा मृद सर्वेक्षणक मृद चाचणी अधिकारी,लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. राज्यात रासायनिक खताचा कमीत-कमी व संतुलित वापर होण्याच्या उद्देशाने खरीप 2021 मध्ये खत बचतीची विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये किमान 10 टक्के रासायणिक खतांचा वापर कमी करण्यासाठी मे महिन्याच्या चालू सप्ताहात या मोहिमेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी विशेष प्रत्यत्न कृषि विभागामार्फत क्षेत्रिय स्तरावर करण्यात येत आहेत.
या मोहिमेंतर्गत शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी विशेषत:- तुर,सोयाबिन,कापूस,ऊस इत्यादी पिकांकरिता खत वापराचे विविध फायदेशिर पर्याय उपलब्ध करून देणे,प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जमिन सुपिकता निर्देशांक दर्शविणारा फलक प्रदर्शित करणे, व त्याचे सामुहिक वाचन करणे,जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करणे,जैविक खतांची बीज प्रक्रिया करणे,युरिया खताचा जास्त वापर असलेल्या तालुक्यातील सर्व कृषि केंद्र चालकांना प्रशिक्षण देणे,जमिनित सेंद्रीय कर्बाची वाढ होण्यासाठी ऊसाची पाचट जाग्यावर कुजविणे, व्हर्मी कंम्पोस्ट,नाडेप युनिट, गांडूळ खत,कंम्पोस्ट खत यांचा वापर वाढवून रासायनिक खतांची मागणी कमी करणे तसेच विविध पिक योजनेंतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मोहिमेत जास्तीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी कृषि विभागाने आवाहन केले आहे.
वृत्त क्र.352
शिवभाजन थाळी मोफत उपलब्ध करून देण्यास मुदत वाढ
लातूर (जिमाका),दि.20: ब्रेक द चेन ची प्रक्रिया राज्यभरात सूरु झाली आहे. त्यानुषंगाने शासन निर्णयान्वये शिभोजन थाळी 15 एप्रिल 2021 पासून पुढे एक महिना नि:शुल्क उपलबध करून देण्यास शासन मान्यता देण्यात आली होती. ब्रेक द चेन च्या प्रक्रियेतंर्गत राज्यात कडक निर्बध लागू करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने गरीब व गरजू लोकांना जेवणा अभवी हाल-आपेष्टा सहन कराव्या लागू नयेत यासाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलबध करून देण्याचा कालावधी दि.15 मे 2021 पासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वाढविण्याचा प्रास्ताव शासनाच्या विचाराधिन होता. यासाठी शसानाने पुढील निर्णय घेतला आहे:-
दि.15 मे 2021 पासून एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच या कालावधीत संपूर्ण राज्याच शिभोजन थाळीचा इष्टांक 2.00 लक्ष प्रतिदिन एवढा करण्यात आला आहे. सदर मुदत दि.15 मे 2021 पासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी वाढविण्यात येत आहे. तसेच शिभोजन थाळीच्या राज्याच्या प्रतिदिन इष्टांकामध्ये दीड पट वाढ करण्यात येत आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या शिभोजन केंद्रानाही या सूचना लागू राहतील तसेच दि.15 एप्रिल 2021 च्या शासन निर्णयाप्रमाणे नमुद केलेल्य इतर सूचना कायम राहतील,असे सहसचिव, महाराष्ट्र शासन, चारूशीला तांबेकर यांनी कळविले आहे.
वृत्त क्र.353
जादा दराने खत विक्री केल्यास संबंधित कृषि अधिकारी
कार्यालयाशी संपर्क साधावा
लातूर,(जिमाका) दि.20:-केंद्र शासनाच्या एनबीएस धोरणानुसार युरिया वगळता इतर खताचे दर निश्चित करण्याचा अधिकारी खत उत्पादक कंपीनस आहे त्यामुळे बाजारात एकाच प्रकारच्या खताचे विविध कंपीनीचे भाव वेगळे असल्याने शेतऱ्यांनी खरेदी करता वेळी खात्री करावी. तसेच काही विक्रेत्याकडे जुन्या दराचे रासायनिक खत उपलबध असून देत नसल्यास किंवा जास्त पैशाची मागणी करत असल्यास व इतर रासायनिक खत,बियाणे व किटक नाशक बाबत तक्रारी असल्यास तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत किंवा जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा कक्षातील मोहिम अधिकारी जी.जे शेरखाने मो.नं.9422657691 व जिल्हा गुण नियंत्रण निरिक्षण पी.के.देवकते मो.नं.9834924771 यांच्यशी संपर्क साधाावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. एस. गावसाने व कृषि विकास अधिकारी एस आर.चोले यांनी केले आहे.
जिल्ह्यात खरीप 2021 हंगामासाठी रासायनिक खते व बियाणांच्या खरेदीची शेतकऱ्यांकडून लगबग सुरू आहे. एप्रिल पासून युरिया वगळता इतर रासायनिक खताच्या किंमतीमध्ये रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी वाढ केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एप्रिल पूर्वीचा व त्यानंतर पुरवठा झालेल्या डीएपी, एमोप मसेच सिंगल सुपर फॉस्फेट आदी रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहेत. जुन्या व नवीन दराची रासायनिक खते बाजारात असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी करताना खताच्या गोणीवरील किरकोळ विक्री किंमत पाहूनच खतांची खरेदी करावी. तसेच रासायनिक खत विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या ई-पॉस मशीनची पावती किक्रेत्याकडून घ्यावी. त्यावरून रासायनिक खत व बियाणांची किंमत पडताळणी करता येईल.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.