नागरसोगा येथे तरुणांनी दिले हरीणाच्या पाडसाला जिवदान जखमी पाडसाला केले वनविभागाकडे सुपुर्त
औसा-
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील तरुणांनी सोमवारी साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान नागरसोगा जवळगा रोडवर हरीणांचे नवजात पाडस कुञ्याच्या तावडीत सापडलेले पाहिले. या नवजात पाडसाला कुञ्यांनी जखमी केले हे पाहुन तरुणांनी या कुञ्याचा पाठलाग करुन त्या पाडसाला पकडले. त्याला पाणी पाजून त्याची जखम स्वच्छ केली. व त्याला गावात आणून वन विभागाला याची माहिती दिली. कांही वेळानंतर वन विभागाचे कर्मचारी गावात येऊन त्यांनी ते पाडस ताब्यात घेतले.आणि तरुणांनी या पाडसाचा जीव वाचविला म्हणून त्यांचे अभिनंदन हि केले.
याबाबत ची माहिती अशी कि अजितसिंह चौहाण विनोद कदम परमेश्वर कोळी यांनी नागरसोगा जवळगा रोडवर हरीणाचे एक पाडस आणि त्याच्या मागे कुञे असे दृश्य पाहिले. या तरुणांनी आपल्या मोटारसायकल शेतात या कुञ्या मागे घातल्या. आणि कांही अंतर गेल्यावर कुञ्याच्या तावडीतून त्या हरीणाच्या पाडसाला आपल्या ताब्यात घेतले.यानंतर या तरुणांनी या हरीणाला विनोद कदम यांच्या दुकानात आणून त्याच्या जखमा स्वच्छ केल्या. आणि हरीणाचे हे पाडस जखमी अवस्थेत सापडल्याची माहिती सरपंच सौ.सरोजा सुर्यवंशी यांना दिली. त्यानंतर सरपंचानी वनविभागाशी संपर्क करुन या जखमी पाडसाची माहिती दिली. त्यानंतर एक ते दिड तासात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात येऊन सरपंच सरोजा भास्कर सुर्यवंशी व हरीणाच्या पाडसाला वाचविणारे तरुण अजितसिंह चौहाण विनोद कदम परमेश्वर कोळी भास्कर सुर्यवंशी बाळासाहेब कुलकर्णी यांच्या कडून ताब्यात घेतले व वन विभागाच्या औसा येथील कार्यालयात घेऊन गेले.
नागरसोगा गावात जखमी हरीणाच्या पाडसाला वाचविणाऱ्या या तरुणाचे मिञ मंडळी व ग्रामस्थां कडून अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.