प्रत्येक भेटून अथवा दूरध्वनीद्वारे
निवडणूक निरीक्षक यांना देता येणार माहिती
लातूर, दि. 15 : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. यासाठी नियुक्त सामान्य निवडणूक निरीक्षक, पोलीस निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात जावून निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेत आहेत. नागरिकांनाही या अनुषंगाने काही तक्रारी अथवा माहिती द्यावयाची असल्यास निवडणूक निरीक्षक यांना प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीद्वारे देता येणार आहे.
लातूर ग्रामीण आणि लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) डॉ. करुणा कुमारी यांची नियुक्ती करण्यात आली असून लातूर शासकीय विश्रामगृह येथील कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत त्या भेटीसाठी उपलब्ध असतील, तसेच 8830324390 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. निलंगा आणि औसा विधानसभा मतदारसंघासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान हे निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून नियुक्त करण्यात आले असून लातूर शासकीय विश्रामगृहातील गोदावरी कक्ष येथे त्यांना भेटण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असून त्यांचा संपर्क क्रमांक 8668304838 असा आहे. अहमदपूर आणि उदगीर विधानसभा मतदारसंघासाठी साकेत मालवीया हे निवडणूक निरीक्षक (सामान्य) असून लातूर शासकीय विश्रामगृह येथील रेणा कक्ष येथे सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत ते भेटीसाठी उपलब्ध असतील. त्यांचा संपर्क क्रमांक 9579294854 असा आहे.
जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून प्रमोद कुमार मंडल यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. लातूर शासकीय विश्रामगृह येथील पैनगंगा कक्षामध्ये सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ते भेटीसाठी उपलब्ध राहतील. त्यांचा संपर्क क्रमांक 9322668630 असा आहे. लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि अहमदपूर विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाने काकराला प्रसांत कुमार यांची निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून नियुक्ती केली आहे. लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथील सरस्वती कक्ष येथे सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ते भेटीसाठी उपलब्ध असून त्यांचा संपर्क क्रमांक 9270154584 आहे. तसेच उदगीर, निलंगा आणि औसा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून डॉ. रामसिंह गुर्जर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर शासकीय विश्रामगृहातील कावेरी कक्षात सकाळी 11 ते दुपारी 12 या कालवधीत ते भेटीसाठी उपलब्ध असून त्यांचा संपर्क क्रमांक 7620552861 आहे.
*****
CoCollector & District Magistrate, LaturaLatur Police DepartmenthChief Electoral Officer Maharashtra
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.