*न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधीची लातुरात उणीव - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर*
लातूर/प्रतिनिधी:सर्वसामान्य जनतेला त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधीची लातुरात उणीव आहे,असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केले.
डॉ.अर्चनाताई पाटील यांनी लातूर येथील न्यायालय परिसरात वकील मंडळींची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी अर्चनाताई पाटील बोलत होत्या.ताईंनी यावेळी वकील मंडळींच्या अडी-अडचणी जानून घेतल्या.वकील बांधवांच्यावतीने सत्कार करुन त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
वकील बांधवांशी संवाद साधताना डॉ.अर्चनाताई म्हणाल्या की,लातूर विधानसभेची लढाई ही साधी नाही.ही लढाई धनशक्ती विरुध्द जनशक्तीची आहे.माझ्या सोबत जनशक्ती आहे.जनशक्तीच्या बळावर प्रत्येक आव्हानाचा सामना करत आपण जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ.अर्चनाताई पाटील म्हणाल्या की,आपल्याशी संवाद साधताना सर्वसामान्यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आसणाऱ्या वकिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधीची उणीव वारंवार जाणवत आहे. लातूरकरांच्या हक्काचा विकास त्यांना मिळवून देण्यासाठी मी मैदानात उतरले आहे.आपले सर्वांचे सहकार्य व जनशक्तीची साथ मला मिळाली आहे.त्यामुळे मी प्रत्येक आव्हानाचा सामना करत लढाई जिंकणार असल्याचा विश्वास डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी व्यक्त केला.
प्रारंभी डॉ.अर्चनातई पाटील यांनी न्यायालय परिसरात फिरून सर्व वकील बांधवांची भेट घेतली.यावेळी वकिलांच्या वतीने ठिकठिकाणी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी वकिलांसाठी बैठक व्यवथा,सुसज्ज ग्रंथालय तसेच अशिलांसाठी विविध सोयी- सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध नसल्याचे सांगुन आगामी काळात न्यायालय परिसरात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना ॲड. प्रदीपसिंह गंगणे यांनी निवडणूकीतील उमेदवार हा या परिसराची जाण असणारा तसेच विकासाची दृष्टी असणारा असायला पाहिजे.सुदैवाने भाजपा महायुतीला असा उमेदवार मिळाला आहे.त्यांच्या नेतृत्वात लातूरच्या विकासाचा अनुशेष भरून निघणार आहे. मतदारांनी ताईंना विक्रमी मतांनी निवडून द्यावे,असे आवाहन केले.
यावेळी ॲड.जगन्नाथ चित्ताडे,ॲड.उदय गवारे,ॲड. प्रदीप गंगणे,ॲड. झडके,ॲड. विजय जाधव,ॲड.उमेश पाटील, ॲड.दयानंद मिटकरी,ॲड. शिवपुरकर,ॲड.कोदळे,ॲड. संतोष गिल्डा,ॲड.सुहास बेद्रे, ॲड.शैलेश पतंगे,ॲड.गवारे मॅडम,ॲड.गोरे मॅडम,ॲड.स्वाती तोडकरी आदी मंडळी उपस्थित होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.