एक लोकप्रतिनिधी म्हणून लातूरकरांचा आणि माझा संवाद व संपर्क कधीच तुटणार नाही.प्रभाग १८ मध्ये डॉ.अर्चनाताई पाटील यांची पदयात्रा
लातूर / प्रतिनिधी :
मी लातूरची रहिवासी आहे.या भागातील समस्यांची मला जाण आहे.शहरातील समस्या सोडविण्याचा प्लॅन माझ्याकडे तयार असून एक लोकप्रतिनिधी म्हणून लातूरकरांचा आणि माझा संवाद व संपर्क कधीच तुटणार नाही.तुमच्या प्रत्येक सुख- दु:खात मी नेहमी सोबत असेन. प्रभागात मूलभूत सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,अशी ग्वाही डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांनी दिली.
भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी प्रचारानिमित्त प्रभाग क्रमांक १८ मधील बसवेश्वर चौक व परिसरात शनिवारी (दि. ९) सकाळी पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला.यावेळी डॉ.चाकुरकर बोलत होत्या.यावेळी महिला व नागरिकांनी प्रभागातील समस्यांचा पाढाच ताईंसमोर वाचला.
महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व आशीर्वाद घेऊन पदयात्रेस प्रारंभ झाला.यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर,महात्मा बसवेश्वर मंडलाध्यक्ष संजय गीर, माजी नगरसेविका रागिनीताई यादव,भाग्यश्री शेळके,मीनाताई भोसले,मीनाताई गायकवाड, आशाताई घायाळ,गजेंद्र बोकन, सतिश माने,शशिकांत हांडे,दत्ता बोरोळे,बुथ प्रमुख धनंजय हाके, महेश बरगले,सिध्देश्वर सुलगुडले,आकाश बजाज,पवन स्वामी,शिवाजी कामले,राजेश पवार,शिवसेना शहर प्रमुख दिनेश बोरा,शिवसेना समन्वयक दिपक बडगिरे,चंद्रकांत शिंदे, संदीप मामा जाधव आदींसह महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.