औसा नगरपालिके अंतर्गत काळाची गरज ओळखून जॅम्बो कोविड सेंटर सुरू करा:अफसर शेख

 औसा नगरपालिके अंतर्गत काळाची गरज ओळखून  जॅम्बो कोविड सेंटर सुरू करा:अफसर शेख





 औसा मुख्तार मणियार

एम आय एम पक्षाचे औसा तालुका प्रभारी इंचार्ज अफसर शेख यांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आज दि.10 मे 2021 सोमवार रोजी काळाची गरज ओळखून नगरपालिके अंतर्गत जॅम्बो कोवीड सेंटर सुरू करा अशी मागणी एका निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे. या

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहता शहरांमध्ये अनेक रुग्णांची हेळसांड होत आहे. तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये पुरेशी सोय नसल्यामुळे रुग्णांना बाहेर गावी जावे लागत आहे . या कालावधीत अनेक रुग्णांचे जीव जात आहेत. त्यामुळे माननीय मुख्याधिकारी साहेबांनी नगरपालिके अंतर्गत जंबो कोविड सेंटर सुरू करावे, जेणेकरून होणार त्रास वाचेल व रुग्नांचे जिव वाचतील. आमच्या अर्जाचा विचार करून ताबडतोब निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही एमआयएम पक्षाच्या वतिने  करीत आहोत. या निवेदनावर एम आय एम पक्षाचे औसा तालुका प्रभारी इन्चार्ज अफसर शेख यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या