मुरघास निर्मिती लाभार्थ्यांनी 15 जूलै पर्यंत अर्ज करावेत
जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
लातूर, दि.25(जिमाका):- राष्ट्रीय पशुधन अभियान (अनुसुचित जाती उपयोजना) अंतर्गत मुरघास निर्मिती करीता लातूर जिल्हयामध्ये 01 सायलेज बेलर युनिट स्थापनेसाठी दि.1 जूलै ते 15 जूलै 2021 या कालावधीत लाभार्थी निवड प्रक्रीयेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
सदर अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध् करुन देण्यात आला आहे.लातूर जिल्हयातील अनुसूचित प्रवर्गातील सहकारी दुध उत्पादक संस्था / संघ, शेतकरी उत्पादक कंपनी / संस्था, स्वंयसहाय्यता बचत गट तसेच अनुसूचित प्रवर्गातील गोशाळा/ पांजरपोळ / गोरक्षण संस्था यांना अर्ज भरता येईल.
सदर योजनेसाठी एका युनिटसाठी रु. 20 लक्ष खर्चा पैकी 50 टक्के रु. 10 लक्ष केंद्रशासनाचे अर्थसहाय्य असुन उर्वरित 50 टक्के रु. 10 लक्ष संस्थेने खर्च करावयाचे आहे. योजनेच्या लाभासाठी रु. 10 लक्ष निधी खर्च करण्याची आर्थिक क्षमता असणे आवश्यक आहे.संस्थेने / लाभार्थ्यांने मशीनरीची (सायलेज बेलर,किमान 2 मे.टन. प्रति तास क्षमतेचे हेवी डयुटी कडबाकुट्टी यंत्र, ट्रॅक्टर व ट्रॉली,वजन काटा,हार्वेस्टर,मशीन शेड) खरेदी केल्यानंतर पडताळणी करुन निधी संस्थेच्या / लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यईल, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, डॉ.नानासाहेब सखाराम कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
****
वृत्त क्र.533 दिनांक:-25 जून 2021
आय. टी. आय. उत्तीर्णसाठी
29 जून रोजी मेळावा आयोजन
लातूर, दि.25(जिमाका):- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिवाजी चौक, लातूर येथे मे. SUZUKI MOTORS प्रा. लि. गुजरात या कंपनीचा आय. टी. आय. उत्तीर्ण व्यवसाया करीता भरती मेळावा आयोजित केला आहे.
या मध्ये (FITTER, DIESEL, MECH, MOTOR, MECH, TURNER, MACHINIST, WELDER, ELECTRICIAN, TOOL, & DIE MAKER, PPO, COE (AUTOMOBILE ) TRACTOR MACH, PAINTER,) (G) असे आहे.
आवश्यक पात्रता,वय 18 ते 23 वर्ष (जन्म तारीख 10 जुलै 1998 ते 10 जुलै 2003 या दरम्यानच असावी), 10 मार्क 55 टक्के आयटीआय मार्क 60 टक्के निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीकडून 19 हजार 400 पगार व इतर सोयी दिल्या जाणार आहेत.
तसेच दिनांक 29 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता आवश्यक सर्व कागदपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती पासपोर्ट आकाराचे दोन फोटो व इतर मुळ तसेच झेरॉक्स सर्व कागदपत्रासह हजर रहावे, असे आवाहन प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर, यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
****
वृत्त क्र.534 दिनांक:-25 जून 2021
महाडिबीटी प्रणालीवर कागदपत्रे
अपलोड करण्यासाठी जून अखेर मुदत
लातूर, दि.25(जिमाका):- प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत सन 2021-22 मध्ये ठिबक तूषार संचाच्या अनूदानासाठी महाडिबीटी प्रणालीवर लातूर जिल्हयातील आज अखेर 7 हजार 573 लाभार्थ्यांची लॉटरीव्दारे निवड झालेली आहे. त्यापैकी 2 हजार 779 लाभार्थ्यांने कागदपत्रे अपलोड केलेले आहेत व उर्वरित 3 हजार 508 लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत .
कागदपत्रे अपलोड करण्यासाठी जून 2021 अखेर पर्यंत मूदत देऊन विहित कालावधीत अपलोड न केल्यास असे अर्ज महाडिबीटी पोर्टल मधून रद्द करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.ज्या लाभार्थ्यांची लॉटरीव्दारे निवड झालेली आहे. ज्यांनी महाडिबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केलेले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांनी जून 2021 अखेर पर्यंत तात्काळ कागदपत्रे अपलोड करण्यात यावीत अन्यथा कागदपत्रे अपलोड न केलेल्या लाभार्थ्यांनी निवड रद्द करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ङिएस.गावसाने यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.535 दिनांक:-25 जून 2021
जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक व दुय्यम निबंधक कार्यालय
26 व 27 जून रोजी सुरु राहणार
लातूर, दि.25(जिमाका):-महाराष्ट्र शासनाने कोव्हीड-19 मुळे उदभवलेल्या अभुतपूर्व परिस्थितीमुळे एप्रिल ते मे महिन्यात लॉकडाऊनमुळे विहीत कालावधीत नोंदणी न झालेल्या दस्तावर देय होणारी शास्ती महाराष्ट्र नोंदणी नियम, 27 च्या प्रचलित तरतूदीप्रमाणे माहे डिसेंबर 2020 मध्ये पुर्ण मुद्रांकित व निष्पादीत अभिहस्तांतरण, विक्री करारनामा मसेच महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनु अनुच्छेद 36 (4) मधील दस्तावर प्रथम दोन महिन्यांसाठी तर माहे जानेवारी 2021 मध्ये पूर्ण मुद्रांकित व निष्पादीत दस्तावर प्रथम महिन्यासाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती 1 हजार रुपये इतकी निश्चीत करण्याचे परिपत्रक दि. 24 जून 2021 रोजी जाहीर केले आहे.
नोंदणी नियम 1961 चे कलम 27 नुसार दस्त निष्पादीत झाल्यापासून 4 महिन्यांनंतर पहिल्या महिन्यास नोंदणी फी च्या अडीच पट,दुसऱ्या महिन्यास नोंदणी फी च्या पाच पट,तिसऱ्या महिन्यास साडेसात पट व चौथ्या महिन्यास दहा पट दंड आकारुन दस्त नोंदणी करण्याची तरतूद आहे.
सदरील परिपत्रकानुसारमाहे डिसेंबर 2020 मध्ये पुर्ण मुद्रांक शुल्क भरलेल्या व निष्पादीत झालेल्या अभिहस्तांतरण,विक्री करारनामा आणि 29 वर्षापुढील भाडेपट्टा करारनामा या दस्तांना दोन महिन्यांसाठी तर माहे जाने 2021 मध्ये पुर्ण मुद्रांक शुल्क भरलेल्या व निष्पादीत झालेल्या वरील दस्तास प्रथम महिन्यांसाठी देय होणारी शास्ती कमी करुन ती 1 हजार रुपये मात्र इतकी निश्चीत केलेली आहे.
त्यासाठी लातूर जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक व दुय्यम निबंधक कार्यालय दि. 26 व 27 जून 2021 या दोन्ही दिवशी (शनिवार व रविवार) सुरु ठेवण्यात येणार आहेत. तरी नागरीकांनी या सवलतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी ध.ज.मोईनकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
****
वृत्त क्र.536 दिनांक:-25 जून 2021
जिल्ह्यात 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण
सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार
लातूर,दि.25(जिमाका):-लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 26 जून 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.
उपजिल्हा रुग्णालय उदगीर,पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय औसा,पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय चाकूर, पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय देवणी पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा डोस ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय कासारशिरशी पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट,ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट व जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा कोविशिल्ड ऑनस्पॉट डोस सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार.
18 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध् साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 26 जून 2021 रोजी कोवीशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.
लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.537 दिनांक:-25 जून 2021
*महानगरपालिके मार्फत 18 ते 44 व 45 वर्ष पुढील
वयोगटासाठीचे लसीकरण 15 केंद्रावर होणार*
18 ते 44 वर्षे वयोगटातील पहिल्या डोससाठी 50 टक्के ऑनलाईन
व 50 टक्के ऑनस्पॉट लसीकरण
लातूर,दि.25(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिके मार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 26 जून 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 18 ते 44 व 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे. नागरीकांची गर्दी जास्त झाल्यास गरजेनुसार सत्र चालू होण्यापुर्वी टोकन क्रमांक देण्यात येतील,अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर,दयांनद कॉलेज बार्शी रोड, लातूर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लातूर (I.T.I. कॉलेज, छत्रपती शिवाजी चौक लातूर), विवेकानंद प्रा.विदयामंदिर (शिवाजी शाळा प्रांगण),लेबर कॉलनी लातूर, यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली, लातूर,प्रा.ना.आरोग्य केंद्र,राजीव नगर, विवेकानंद चौक लातूर व प्रा.ना.आरोग्य केंद्र,मंठाळे नगर, (मनपा शाळा क्र.09), कै. बब्रुवान काळे आयुर्वेद महाविद्यालय, भोई गल्ली लातूर येथे कोव्हीशिल्ड व कोव्हॅक्सीन लस, तसेच जटाळ हॉस्पीटल,अंबाजोगाई रोड,गायत्री हॉस्पीटल,बार्शी रोड, विवेकानंद हॉस्पीटल सिग्नल कॅम्प, एमजे हॉस्पीटल, एमआयडीसी रोड, कार्नर, अलहयात हॉस्पीटल,अन्सार कॉलनी, सहारा हॉस्पीटल, आयेशा कॉलनी व सिध्दीविनायक हॉस्पीटल,औसा रोड, लातूर येथे कोव्हीशिल्ड लस दिली जाणार आहे.
18 ते 44 वयोगट फक्त पहिला डोस 45 वर्षे पुढील वयोगट 45 वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस. कोव्हॅक्सीन 18 ते 44 वयोगट फक्त दुसरा डोस (पहिला डोस घेवून 28 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील ) व 45 वर्षे वरील वयोगट फक्त दुसरा डोस. (मार्च व एप्रिल महिन्यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांना प्राधान्य ) 18 ते 44 वयोगट फक्त पहिला डोस, 45 वर्षावरील नागरीकांचा कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेवून 84 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस सर्व सात केंद्र. येथे सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील. वरील चार खाजगी रुग्णालयात मनपा मार्फत मोफत लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.
मोबाईल पथक लसीकरण केंद्र (संबंधित परीसरातील नागरीकांसाठी) Near To Home वाले इंग्लिश स्कुल लातूर येथे 18 ते 44 वर्षे वयोगट व 45 वर्ष पुढील वयोगट कोव्हिशिल्ड लस ऑनस्पॉट 18 ते 44 वयोगट फक्त पहिला डोस 45 वर्षेावरील नागरीकांचा कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (पहिला डोस घेऊन 84 दिवस पुर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील) HCW व FLW यांचा पहिला व दुसरा डोस ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
******
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.