विद्यार्थी हक्क कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या वतीने माणुसकीचे दर्शन पुरस्कार सोहळा 2021चे आयोजन
लातूर: विद्यार्थ्या कृती समिती हि महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी आणि विद्यार्थ्यांतील कला,क्रीडा,कौशल्य,सांस्कृतिक व शैक्षणिक इत्यादी गोष्टींचा विकास करण्यासाठी राजकारण,जातिवाद,प्रांतवाद बाजूला ठेवून स्थापन केलेली समिती आहेत.
गौरव कार्याचा | सन्मान समर्पकतेचा | मानवतेच्या पूजऱ्याचा | निस्वार्थ समाजसेवेचा
कोरोना काळामध्ये ज्यांची कोणत्याही प्रसिद्धीची व स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता समाजासाठी वेगवेगळ्या माध्यमातून अविरत काम केलं. मानवात देवाची अनुभूति दर्शऊन दिली अशा सर्व सन्मान मूर्तीचा माणुसकीचे दर्शन पुरस्कार 2021 देऊन विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. मा.तृप्ती अंधारे मॅडम,शिक्षणाधिकारी लातूर व समितीचे संस्थापक अध्यक्ष ,चेतन अरविंद घोडके (पाटील)यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.एपीजे.अब्दुल.कलाम इन्स्टिट्यूट हॉल उद्योग भवन लातूर येथे हा सोहळा पार पडणार आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.