हासेगाव एम फार्मसी महाविद्यालयाचा १००% निकाल.
औसा येथील हासेगाव मधील श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था, हासेगाव संचलित लातूर कॉलेज ऑफ एम फार्मसी महाविद्यालयाचा हिवाळी २०२० या परीक्षेचा निकाल जाहीर झाला महाविद्यालयाचा निकाल १०० % असून एम फार्मसी (फार्मसितीकॅल केमिस्ट्री) प्रथम वर्षातील विद्यार्थी रविराज ढवळे यांनी ९.९२ स्कोर मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे , तसेच थोरात संकेत यांनी ९.७० स्कोर मिळवून द्वितीय व शेख सोहेल यांनी ९.४७स्कोर मिळवून त्रितीय क्रमांक पटकावला आहे लातूर कॉलेज ऑफ एम फार्मसी महाविद्यालयात एकूण १६ विद्यार्थी आहेत त्यामधील ६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत त्याबद्दल श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकरअप्पा बावगे , संस्थेचे उपाध्यक्षा सौ जयदेवी बावगे सचिव श्री वेताळेश्वर बावगे , कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव च्या प्राचार्या सौ शामलीला बावगे ,लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर चे प्राचार्य श्री नंदकिशोर वावगे, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी चे प्राचार्य रबीक खान , राजीव गांधी पॉलीटेकनिक च्या प्राचार्या सौ योगिता बावगे , ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक कालिदास गोरे , गुरुनाथअप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक आनंद शेंडगे आणि लातूर सायन्स कॉलेज चे श्री बस्वराज वाडीवाले,लातूर कॉलेज आय टी आय कॉलेज प्राचार्य सतीश गायकवाड इत्यादी मान्यवरांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.