महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा ओबीसी आरक्षणास भोवला रस्ता रोको आंदोलनात विकास नरहरे यांची टीका
औसा प्रतिनिधी मुख़्तार मणियार
स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविले आहे. वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने वारंवार 15 वेळा स्मृती पत्र पाठवून राज्य सरकारला ओबीसी प्रवर्गाचे आरक्षणासाठी महत्त्वपूर्ण डाटा आणि माहिती मागविली होती. परंतु महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी नाकर्तेपणा दाखवून टाळाटाळ केल्याने राज्य सरकारचा हलगर्जीपणा ओबीसी आरक्षणाला भोवला असल्याची टीका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विकास नरहारे यांनी केली.शनिवार दिनांक 26 जून रोजी अभिमन्यू पवार शेतकरी नेते पाशा पटेल, माजी नगराध्यक्ष किरण उटगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आणि ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी औसा टी पॉइंट येथे चक्काजाम आंदोलन प्रसंगी विकास नरहरे बोलत होते. पुढे बोलताना विकास नरहरे म्हणाले की, काँग्रेस महाविकास आघाडीत सत्तेत असून आता ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची भाषा करीत ओबीसी समाजाची दिशाभूल महाविकास आघाडी सरकार करीत आहे .भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित रस्ता रोको आंदोलनामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती .या आंदोलनात सुशील कुमार बाजपाई, अॅड मुक्तेश्वर वागदरे, अॅड अरविंद कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष काकासाहेब मोरे ,सुनील उटगे, प्रा भीमाशंकर राचट्टे, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, युवा नेते संतोष मुक्ता, सिद्रामप्पा इळेकर, संदीपान जाधव, महिला आघाडीच्या श्रीमती ज्योती हालकुडे, सोनाली गुळबिले, सूर्यकांत शिंदे, गणेश कोलपाक, बालाजी सूर्यवंशी ,भीमाशंकर मिटकरी, शहराध्यक्ष लहू कांबळे, दिगंबर माळी ,
गजेंद्र डोलारे, भालचंद्र गोडबोले, माधव सिंह परीहार, जगदीश परदेशी ,यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी चा धिक्कार असो, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देऊन राज्य सरकारचा औसा येथील आंदोलनात तीव्र निषेध नोंदविला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.