*नौकर भरतीतील मागासवर्गीयांचा* *अनुशेष विनाविलंब भरण्यात यावा म्हणून* *जिल्हाधिकारी लातुर याचे मार्फत मा** *मुख्यमंत्री यांना कास्ट्राईब* *कर्मचारी महासंघाचे निवेदन*
*लातुर प्रतिनिधी;-*लक्ष्मण कांबळे*
आज दिनांक २५ जून रोजी लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालया समोर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ व त्यांच्याशी संलग्न विविध विभागातील कास्ट्राईब संघटना च्या वतीने राज्यअध्यक्ष मा. कृष्णा इंगळे साहेबांच्या आदेशाने एक दिवसीय भव्य धरणे आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करून 7 मे 2021 शासन आदेश रद्द करावा व नोकर भरतीतील मागासवर्गीयांचा अनुशेष विनाविलंब भरण्यात यावा.या मागणीचे निवेदन मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी लातूर यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विविध विभागाचे अधिकारी अध्यक्ष सचिव व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य संघटन सचिव श्री महेश कांबळे, लातूर विभागीय अध्यक्ष राहुल गायकवाड,लातूर जिल्हाध्यक्ष सुभाष मस्के, जिल्हा कार्याध्यक्ष जगन्नाथ ठोंबरे,जिल्हा उपाध्यक्ष छगन घोडके,जिल्हा कोषाध्यक्ष सतीश मानकुस्कर,जिल्हा सचिव संजय राऊत,लातूर तालुका अध्यक्ष विशाल ,सचिव संजय सूर्यवंशी,तालुकाध्यक्ष बाबासाहेब इंगळे निलंगा तालुका अध्यक्ष तुळशीराम घोडके औसा तालुका अध्यक्ष बी.डी.सूर्यवंशी,राठोड साहेब,सूर्यवंशी साहेब,पवार साहेब,चौकटे साहेब, दिवेकर साहेब, माझी गट शिक्षणाधिकारी चव्हाण साहेब, वाघमारे साहेब,डी.एस.नररसिंगे सर, दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष तुबांजी साहेब, जी.एल. जोगदंड,गायकवाड सर, नागनाथ कांबळे साहेब,भाले साहेब,शीला उघडेताई,रंजिता कांबळे, वनमाला उघडेताई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.