उस्मानाबाद जिल्ह्यात 28 जून पासुन लेवल 3 चे निर्बंध लागु - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
जून २५, २०२१
उस्मानाबाद :-अल्ताफ़ शेख प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी covid-19 च्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यामध्ये निर्बंध लागू केले आहेत मागील सर्व निर्बंध उल्लेख करत जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक सेवेत असणारी दुकाने यासाठी वेळ ठरवून दिली आहे ते खालील प्रमाणे आहे.
आदेश:
ज्याअर्थी उपरोक्त वाचा क्र. 2 चे अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020" प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.
ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्र. 6 च्या आदेशान्वये 'Levels of Restrictions for SAFE MAHARASHTRA अंतर्गत सर्व प्रशासकीय विभागांमध्ये State Level Triggers लागू केले आहे व प्रशासकीय विभागाचा (जिल्हयाचा) कोविड-19 सकारात्मक अहवाल असलेल्या रुग्णांचा साप्ताहिक दर (Weekly Positivity Rate) व वापरात असलेल्या ऑक्सीजन बेड्सची टक्केवारी यांचा विचार न करता प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये संदर्भ क्र. 5 च्या आदेशात नमूद असलेले कमीत कमी स्तर क्र. 3 (Level 3) मधील निर्बंध लागू होतील असे आदेशित केले आहे.
त्याअर्थी भी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद संदर्भ क्र. 2 अन्वये व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्र. 5 व 6 च्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात संदर्भ क्र. 5 च्या आदेशातील स्तर क्रं. 3 (Level 3) नुसार दि. 28 जुन 2021 पासून खालीलप्रमाणे कार्यवाही करणेबाबत आदेशित करीत आहे.
1
बाब / तपशील
अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधित दुकाने व
निबंधाबाबत सूचना
दररोज सकाळी 07.00 ते दुपारी 04.00 वाजेपर्यंत चालू राहतील.
व्यवसाय अत्यावश्यक वस्तु व सेवांमध्ये समावेश सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते दुपारी 04.00
नसलेली इतर दुकाने व व्यवसाय मॉल्स, चित्रपटगृहे नाट्यगृहे
रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, उपहारगृहे, खानावळी
सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे (मॉर्निंग वॉक), सायकलिंग, बगीचे, उद्याने खाजगी आस्थापनांची कार्यालये
कार्यालयीन उपस्थिती
शासकीय/निमशासकीय/खाजगी
चित्रीकरण
मेळावे
(सामाजिक/सांस्कृतिक/मनोरंजनात्मक)
लग्नसमारंभ
अंत्यविधी
स्थानिक
सभा निवडणुका संस्थांच्या सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा
बांधकाम
कृषि संबंधित बाबी
वाजेपर्यंत चालू राहतील. (शनिवार व रविवारी बंद राहतील.) पूर्णपणे बंद राहतील.
| सोमवार ते शुक्रवार सकाळी 07.00 ते सायंकाळी 04.00 | पर्यंत 50 % आसन क्षमतेच्या मर्यादेत ग्राहकांना आतमध्ये बसवून खाद्यपदार्थ खाण्यासाठी देण्यास परवानगी राहील. शनिवारी व रविवारी पार्सलसेवा/खाद्यपदार्थ घेऊन जाणे (Take Away) घरपोच सेवा (Home Delivery) देण्यास परवानगी राहील.
दररोज सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 पर्यंत चालू राहतील.
सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 04.00 पर्यंत चालू राहतील. (या आदेशात नमूद सूट देण्यात आलेल्या Exemption - Category आस्थापनांची कार्यालये त्यांच्या नियमित | वेळेनुसार सुरु राहतील.)
50 % क्षमतेने सुरु राहतील.
(कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाविषयक कामे करणा-या आस्थापना, कृषी, बँक, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.)
बाहेर खुल्या जागेत
सकाळी 05.00 ते सकाळी 09.00 पर्यंत
केवळ Bubble चित्रीकरणास परवानगी. सायंकाळी 05.00 नंतर बाहेरील हालचालीस पूर्णपणे प्रतिबंध राहील.
सोमवार ते शुक्रवारी सायंकाळी 04.00 पर्यंत
(50 लोकांच्या मर्यादेत परवानगी राहील.)
50 लोकांच्या मर्यादेत परवानगी राहील.
20 लोकांच्या मर्यादेत परवानगी राहील. 50 % क्षमतेने परवानगी राहील.
फक्त बांधकामाचे ठिकाणी (साईट वर) राहणा-या मजुरांना परवानगी अथवा बाहेरुन मजूर येणार असल्यास दुपारी 04.00 नंतर मजूरांनी काम बंद करून बांधकामाचे ठिकाणावरून निघून जाणे बंधनकारक राहील.. दररोज सायंकाळी 04.00 पर्यंत चालू राहतील.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.