संतोष सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनीटायझरचे वाटप

 संतोष सोमवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क व सॅनीटायझरचे वाटप









औसा मुख्तार मणियार

 औसा: शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी वाढदिवसानिमित्त कोरोनांच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क,सँनीटायझरचे वाटप केले.लातूरसह औसा,किल्लारी व तालुक्यातील इतर ठिकाणी इतरही उपक्रम राबविण्यात आले.कोरोनांच्या नियमावलीचे पालन करत हे सर्व कार्यक्रम केले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, उप तालुका प्रमुख प्रवीण बालगिर, किशोर भोसले, लामजना उपसरपंच बालाजी पाटील,अजित सोमवंशी , नागेश कोळपे, सदस्य महेश सगर, राम कांबळे, रणजित शिंदे, महेश बनसोडे, इस्माईल पटेल , खरोसा ग्रामपंचायत सदस्य विशाल माळी, ऋषिकेश पाटवदकर, नांदुर्गा ग्रामपंचायत सदस्य मनोज शिंदे,सचिन कांबळे,अमोल शिंदे, संचालक विजय पवार, प्रवीण कोव्हळे, वैभव मोरे,  श्रीहरी उतके , राहुल मोरे, पत्रकार सूर्यकांत बाळापुरे , पत्रकार सतीश सरतापे आदी उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या