सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालयात
विधवेेच्या हस्ते छ.शाहू प्रतिमेस अभिवादन
विधवेेच्या हस्ते छ.शाहू प्रतिमेस अभिवादन
लातूर,दि.२६ः लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने लातूरच्या सम्राट अशोक सार्वजनिक वाचनालय विस्तारीत वाचन कक्ष - अभ्यासिकेत शनिवार,दि.२६ जून २०२१ रोजी ठकू परसराम जाधव या विधवा-कष्टकरी-पाथरवट महिलेच्या हस्ते लोकराजा शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन सामूहिक अभिवादन करण्यात आले.
वैद्यराज तुकाराम रोकडे यांच्या हस्ते झालेल्या या अभिवादन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठकू जाधव व भारतीय बौध्द महासभेचे तालुका उपाध्यक्ष देवराव जोगदंडे हे उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ठकू जाधव यांनी शाहू महाराजांच्या स्त्रीयांचा सन्मान करण्याची परंपरा या वाचनालयाने चालविल्याबद्दल खुपच आनंद झाल्याचे सांगितले. देवराव जोगदंडे यांनी शाहू महाराजामुळे बहुजनांच्या प्रगतीचे मार्ग खुले झाले,त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव करण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत,असे नमुद केले.अध्यक्षीय समारोपात तुकाराम रोकडे यांनी या वाचनालयातून खर्या अर्थाने महापुरुषांच्या विचारांचे जतन होत असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालय सचिव बाळकृष्ण होळीकर यांनी केले.कोषाध्यक्ष संजय सूर्यवंशी यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी लिपीक संकेत होळीकर, नितीन चालक आदिंनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.