दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीचे नाव न नोंदविता राजकीय लोकांच्या सांगण्यावरुन अज्ञात व्यक्तीचे नाव नोंदवुन गुन्हा दाखल केला पीड़ित परिवारचा चा आरोप परिवारचा चा आरोप

राजकीय लोकांच्या सांगण्यावरुन दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीचे नाव न नोंदविता अज्ञात व्यक्तीचे नाव नोंदवुन गुन्हा दाखल केला पीड़ित  परिवारचा चा आरोप






औसा प्रतिनिधी 

भादा पोलीसांनी राजकीय लोकांच्या सांगण्यावरुन दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीचे नाव न नोंदविता अज्ञात व्यक्तीचे नाव नोंदवुन गुन्हा दाखल केला आहे. तरी मुळ महादेव लक्ष्मण कागे व रामेश्वर मिटु कांबळे या दोघा विरुध्द गुन्हा दाखल करुन न्याय देणे बाबत. दि. ०४/०६/२०२१ रोजीचा तक्रारी अर्ज

दि. २५/०६/२०२१ रोजी अर्ज आरोपीचे नाव घालुन दिला असता महादेव लक्ष्मण कागे व रामेश्वर मिटु कांबळे यांनी आयेशा जाफर सय्यद या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवुन गेले आहे. परंतु पोलीसांनी राजकीय लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणून आम्ही दि. ०४/०६/२०२१ रोजी या सर्व प्रकारची माहिती मा. पोलीस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे दिली होती. तसेच मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, औसा यांना निवेदन दिले होते. तुमचे काम चार दिवसात होईल असे अश्वासन दिल्यामुळे आम्ही दि. ०७/०६/२०२१ रोजी अमरण उपोषणास बसणार होतो. परंतु अश्वासन दिल्यामुळे आम्ही ते उपोषण थांबविले. परंतु आम्हाला न्याय मिळकत नाही. आमच्यावर अन्याय होत आहे. आमच्यासोबत भेदभाव केला जातो. पोलीस प्रशासन जाणून बुजून गुन्हेगाराला अटक न करता गुन्हेगार रामेश्वर मिटु कांबळे हा व ज्याची गाडी अपहरण करण्यासाठी वापरली तो समीर याकुब सय्यद हे दोघे राजरोष गावात फिरत आहेत.


तरी मा. साहेबांनी चार दिवसात माझी मुलगी  व आरोपी महोदव लक्ष्मण कागे, रामेश्वर मिटु कांबळे, समीर याकुब सय्यद यांना पकडून आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, अन्यथा आम्ही दि.१४/०६/२०११ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी औसा येथे अमरण उपोषण करणार आहोत याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर राहील, याची नोंद घ्यावी, असे जफर अकबर सय्यदरा उजनी यांनी उप विभागीय अधिकारी, औसा ला पत्र लिहून काळविले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या