*पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन*
लातूर प्रतिनिधी
लातूर जिल्हा पोलीस दल आणि तेजस्विनी हेल्थ केअर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अमलदार यांची आरोग्य तपासणी साठी आरोग्य शिबिर आज रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव हे उपस्थित होते . तसेच तेजस्विनी हेल्थ केअर ,मुंबई येथील डॉक्टर रघुनाथ गावडे, डॉक्टर आनंद तावडे ,श्री प्रथमेश घारगे, श्री उमेश नवसे यांच्या पथकाकडून पोलीस अधिकारी / अंमलदार आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होणार असून यामध्ये प्रामुख्याने पाठीचे मणक्याचे आजार ,ब्लड शुगर, ब्लड प्रेशर आणि हृदय विकार या संबंधाने सर्व चाचण्या केल्या जाणार आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील विश्रांती विसावा कक्षात हे शिबिर आयोजित करण्यात आले असून यामध्ये सर्व कार्यालयीन कर्मचारी पोलिस अधिकारी अंमलदार यांची चाचणी सुरू आहे. यावेळी पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे ,पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे, पोलीस निरीक्षक बालाजी मोहिते, राखीव पोलीस निरीक्षक धोंडगे सपोनि उगले, सपोनि निकम पोलीस कल्याण शाखेचे बिराजदार, होमगार्ड घोडके उपस्थित होते.
मुंबईच्या डॉक्टरांचे हे पथक लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पुढील आठवड्यात सर्व पोलिस अंमलदार आणि अधिकारी यांची वैद्यकीय तपासणी करणार आहेत. सदरचे आरोग्य शिबिर 23/06/2021 पर्यंत चालणार असून यामध्ये लातूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस अधिकारी/ अमलदार, कार्यालयीन अधिकारी/कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होणार आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.