माझं लातूर कोव्हिड मदत केंद्र राज्यात एक आदर्श उदाहरण
माझं लातूरच्या मदत केंद्रामुळे प्रशासनाचा महापालिकेचा ताण कमी झाला
---- महापौर विक्रांत गोजमगुंडे
लातूर... दि.9
माझं लातूर कोव्हिड मदत केंद्र राज्यात एक आदर्श उदाहरण ठरलेले आहे. या मदत केंद्रामुळे प्रशासनाचा महापालिकेचा ताण कमी झाला असे प्रतिपादन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले.
लातूर येथील शाहू प्रतिष्ठान आणि सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने covid-19 मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माझं लातूर समूहातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनोगत व्यक्त करताना महापौर विक्रांत गोजमगुंडे बोलत होते. याप्रसंगी एडवोकेट बळवंत जाधव गुरुनाथ मगे देविदास काळे अविष्कार गोजमगुंडे डॉक्टर पठाण रवी सुर्वे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. आपत्ती ओसरल्यानंतर ज्यांनी आपत्तीमध्ये लोकांना सावरण्याचे काम केले त्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. माझं लातूर चे काम मोठ्या प्रमाणात झाले माझं लातूर गोविंद मदत केंद्र राज्यात एक आदर्श उदाहरण ठरले आहेत. पत्रकारांनी राजकारणी अधिकारी यांच्या चुका दाखवायच्या समस्या मांडायच्या आणि दुसऱ्याकडून त्या दूर करण्याचे काम करण्याचा प्रघात आहे पण इथे बिग दूर करण्याचे काम ही झालेले आहे. माझं लातूर मुळे प्रशासन आणि महापालिकेचा ताण कमी झाला माझं लातूरने केवळ हेल्पलाइन सुरू केली नाही तर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा केंद्र सुरू केले निधी संकलन करून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट सुविधा उपलब्ध करून दिली. लातूर मधील सगळ्या समाज घटकांनी एकत्र येऊन केलेल्या कामामुळे कुणाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटावर मात करता आली. कोरोना ची तिसरी लाट येणार आहे असे तज्ञ सांगत आहेत त्याची आव्हाने वेगळी राहणार आहेत त्यासाठी पण सर्वांनी खंबीरपणे काम करण्यास तयार रहवे असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले. यावेळी एडवोकेट बळवंत जाधव, गुरुनाथ मगे, देविदास काळे, रवी सुडे, तम्मा पावले, सितम सोनवणे यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संयोजक डॉक्टर आनंद कलमे, भगवंत कदम , निरंजन रेड्डी, मनोज दुधाटे ,प्रमोद गुडे यांच्यासह शाहू मित्र मंडळ व सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.