उच्च शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांना तात्काळ लसीकरण करा.
संभाजी ब्रिगेड.
सोलापूर (प्रतिनिधी) परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने लस उपलब्ध करून देणे बाबत संभाजी ब्रिगेड सोलापूर शहराध्यक्ष शाम कदम यांच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजय खराटे यांना निवेदन सादर करण्यात आले.
संभाजी ब्रिगेड च्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ उच्च शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांना लस देण्याची व्यवस्था महानगर पालिका च्या वतीने करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
या निवेदनात कोरोनोचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. म्हणून देशात लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.
आपल्या सोलापूर शहरातील काही होतकरू आणि उच्च शिक्षित मुलं शिक्षण, संशोधन आणि नोकरी निमित्ताने परदेशात जावू इच्छितात, पण केवळ योग्य लसीची मात्रा न मिळाल्याने त्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाता येत नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या लसींचा तुटवडा असल्याने व 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू असल्याने १८ ते ४४ वर्षे वयोगटाचे लसीकरणही सद्या स्थगित आहे. त्यामुळे परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका च्या वतीने अशा विद्यार्थ्यांसाठी तात्काळ लस उपलब्ध करून देण्यात यावे तसेच
दुसर्या डोसमधील अंतर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार ८४ दिवस करण्यात आला आहे. मात्र, परदेशातील बहुतांशी विद्यापीठांचा अभ्यासक्रम ऑगस्टदरम्यान सुरू होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दुसरा डोस घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे दुसर्या डोसबाबत सोलापूर महापालिकेने निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून करण्यात येत आहे याचा विचार करून पालिकेने केंद्राला पत्र पाठवून दोन डोसमधील ८४ दिवसांचे अंतर विशेष बाब म्हणून सहा आठवड्यांपर्यंत कमी करावे अश्या मागण्या संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे सीताराम बाबर महेश माने विठ्ठल जाधव शंकर पडसलगी स्वप्निल शिंदे महेश जाधव ईत्यादी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.