माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. सदर उपक्रम सतीष मिर्चे (काका) व बस्वराज मुस्तापुरे यांच्या पुढाकारातून घेण्यात आले. सर्वप्रथम ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वरास सतीष मिर्चे (काका) यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करून माजी खासदार निलंगेकर यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. शहरातील एसओएस बालाग्राम व मातोश्री वृद्धाश्रम येथे अन्नदान करून रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरणार्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनाही अन्नदान करण्यात आले. यावेळी प्रदेश भाजपाच्या प्रेरणा होनराव यांची उपस्थिती होती.
कै. दिलीपभाऊ पाटील निलंगेकर पतसंस्थेच्या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, सुरेश राठोड, नगरसेविका सौ. शोभा पाटील, सौ. शितल मालू, सौ. मिना भोसले, शोभा कोंडेकर, रत्नामाला घोडके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबिरात 51 दात्यांचे रक्तसंकलन करण्यात आले. सौ. प्रेरणा संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शहरातील भाजी विक्रेत्यांना आगामी पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर छत्र्यांचे व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी ठरणार्या आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शहरातील बेघर व निराधारांना सतरंजी व चादरीचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासण्यात आली. या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी नितीन हासाळे, वैभव डोंगरे, अशिष मुळे, अभिजित मुनाळे, ज्ञानेश्वर गंभीरे आदींनी परिश्रम घेतले.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.