अक्का फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा गौरव

 


अक्का फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा गौरव





लातूर/प्रतिनिधी ः- जिल्ह्यात अनेक सामाजिक संस्था विविध माध्यमातून कार्यरत आहेत. भारतीय संस्कृतीला साजेसे, निस्वार्थ त्याचबरोबर संवेदनशिलपणे व उल्लेखनीय काम अनेक सामाजिक संस्थांकडून होत आहे. या प्रकारचे उल्लेखनीय कार्य करणार्‍या संस्था व त्यांच्या पदाधिकार्‍यांना भविष्यात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांनी केलेल्या कार्याची अधिकची नोंद व्हावी या उद्देशाने अक्का फाऊंडेशनच्या वतीने गौरव सोहळा शुक्रवार दि. 4 रोजी आयोजित केला असल्याची माहिती युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध समाजासाठी निस्वार्थपणे काम करणार्‍या विविध संस्था आणि त्याचे पदाधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक समाज घटकांना मदत मिळालेली असून त्यांना दिलासा देण्याचे काम ही झालेले आहे. याच पद्धतीने अक्का फाऊंडेशन सुद्धा जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात कार्य करीत असून यासाठी विविध उपक्रमही राबविण्यात आले आहेत. विशेषतः भीषण पाणी टंचाईत अक्का फाऊंडेशच्या वतीने इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवून सिंचनाची पातळी वाढविण्यासाठी मोठे कार्य केले आहे. याच पद्धतीने अनेक संस्थाही वेगवेगळ्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि समाजघटकांच्या हितासाठी काम करीत आहेत.
विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्था व त्यांचे पदाधिकारी यांचा गौरव करून भविष्यात त्यांना कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अक्का फाऊंडेशनने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त गौरव सोहळा आयोजित केला आहे. उल्लेखनिय कार्य करणार्‍या संस्था व त्यांच्या पदाधिकार्‍यांचा गौरव सोहळा शुक्रवार दि. 4 जून रोजी पार पडणार आहे.  या गौरव सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राज्य विक्रीकर विभागाचे सह आयुक्त जी. श्रीकांत तर विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांची उपस्थिती राहणार आहे. हा गौरव सोहळा कार्निवाल रिसोट येथे सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार असून या गौरव सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले आहे. सदर गौरव सोहळा कोरोना नियमांचे पालन करून होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या