महात्मा बसवेश्‍वरांचे विचार औसा तालुक्यात घराघरात पोहचवणार ः प्रा.सुदर्शनराव बिरादार

 महात्मा बसवेश्‍वरांचे विचार औसा तालुक्यात घराघरात पोहचवणार ः प्रा.सुदर्शनराव बिरादार







औसा ः लिंगायत महासंघाच्या औसा शाखेच्यावतीने येथील मुक्तेश्‍वर मंगल कार्यालयात दि.7 जुन 2021 रोजी लिंगायत महासंघाची लातूर जिल्हा कार्यकारिणीची व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीचा अध्यक्षीय समारोप करतांना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार म्हणाले की, महात्मा बसवेश्‍वरांचे समतेचे विचार औसा तालुक्यात घराघरात पोहचविण्याचे काम लिंगायत महासंघ करणार आहे. तसेच औसा येथे महात्मा बसवेश्‍वरांचा आश्‍वारूढ पुतळा बसवावा अशीही मागणी त्यांनी केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, लिंगायत समाजाने आता वरून कोणीतरी येईल व आपले प्रश्‍न सोडवेल या आशेमध्ये राहु नका. आता आपणच सर्वसामान्य माणसे एकत्रीत येवून आपले प्रश्‍न आपणच सोडवूया. तुमच्या अडचणीला कोणताही नेता अथवा धर्मगुरू येणार नाही. आपणच एकमेकाला मदत करूया. लिंगायत समाजाच्या मागण्यांसंदर्भात बोलतांना ते म्हणाले, सरसकट लिंगायतांना आरक्षण मिळेपर्यंत हि आरक्षणाची लढाई सुरूच ठेवणार आहे. वाणी नावाला आरक्षण लागू झाले आहे. लिंगायत, हिंदु लिंगायतांना आरक्षण लागु होण्यासाठी शासनाने वाणी व लिंगायत हि एकाच जातीची नावे आहेत असे एका ओळीचे शुध्दीपत्रक काढल्यास त्याचा लाभ सर्व समाजाला होईल. हि मागणी लिंगायत महासंघ तीन सरकारकडे केलेली आहे. महाराष्ट्रात तीन मुख्यमंत्री झाले. अनेक मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासने दिली. पण एका ओळीचे शुध्दीपत्रक काढण्यास या मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. कोणतेही सरकार लिंगायत समाजाच्या भावना समजुन घेत नाहीत. त्यामुळे समाजामध्ये नाराजी पसरलेली आहे. यापुढे सरकारला लिंगायतांची ताकत दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. असा कांही चमत्कार तुम्ही समाज बांधवांनी करावा की, सर्व राजकीय पक्ष व नेते समाजापुढे येवून तुमची सेवा करतील. असे जर नाही झाले तर आम्ही आमचे मत तुम्हाला का द्यावे असा प्रश्‍न त्यांनी नेत्यांना विचारला आहे. तसेच लिंगायत महासंघ यापुढे औसा तालुक्यातील समाजबांधवांशी संपर्क ठेवून राहील.

यावेळी लिंगायत महासंघाच्या औसा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. व त्या तालुकाध्यक्षपदी बसवराज कोपरे यांची निवड करण्यात आली.

यावेळी कवी शिवाजी स्वामी, शिवाजी भातमोडे, बस्वराज कोपरे, दयानंद मठपती, अ‍ॅड.मुक्तेश्‍वर वागदरे, मुख्याध्यापक पटणे, प्रा.राजेश्‍वर पाटील, अ‍ॅड.प्रकाश तोंडारे, लिंगायत महासंघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील, प्रा.नंदकुमार हालकुडे, डॉ.शंकरराव पडसाळगी आदिंची यासमयी भाषणे झाली.

या बैठकीला मुख्य मार्गदर्शक धनंजय कोपरे व लातूरहुन आलेले जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ.काशिनाथ राजे, जिल्हा संघटक नागनाथप्पा भुरके, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, उपाध्यक्ष श्रीरामप्पा पोपडे, करीबसवेश्‍वर पाटील, तानाजी पाटील, जिल्हा सहसचिव माणिक कोकणे, विजयकुमार कुडूंबले, विश्‍वनाथ मिटकरी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य विश्‍वनाथ सावळे स्वामी, जयराज बेलुरे, रमेश वेरूळे, तुकाराम कावळे, मनोज पाटील यांच्यासह उदगीर तालुका संघटक अमरनाथ मुळे, उदगीर तालुकाध्यक्ष प्रा.राजेश्‍वर पाटील, शहराध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश तोंडारे, उपाध्यक्ष प्रभुराज कप्पीकेरे, सुभाष शेरे, महेश पाटील धोंडीहिप्परगेकर, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, अहमदपूर तालुकाध्यक्ष महेश व्होनाळे, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, निलंगा तालुकाध्यक्ष तानाजी डोके, सरचिटणीस अशोक काडादी, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील, उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष व लोहारा तालुका प्रमुख वैजनाथ जट्टे, तुळजापुर तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांच्यासह उमाशंकर मुरगे, उमाशंकर औटी, गणेश बिराजदार, महेश राचट्टे, अ‍ॅड.बी.एस.कारंजे, रवीअप्पा राचट्टे, प्रा.प्रकाश वाघमारे, वैजनाथ शिंदुरे, रमेश तोळमारे, देवराज पाटील आदिसह अनेक कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी भातमोडे यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार किशन कोलते यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या