सहा. पोलीस उपनिरीक्षक मन्मथ स्वामी यांचे
सामाजिक व पोलीस सेवा कार्य उल्लेखनीय
लातूर : गत ३५ वर्षापासून लातूर जिल्हा पोलीस दलात निष्ठेने सेवा बजावणारे व सध्या पोलीस मुख्यालय बाभळगाव रोड लातूर येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असणारे बाभळगाव ता. लातूर येथील सुपूत्र मन्मथ बसवण्णा स्वामी यांचे सामाजिक कार्य व पोलीस सेवेतील सेवा कार्य उल्लेखनीय व उत्कृष्ठपणे चालु असून त्यांच्या कार्याबद्दल समाज व पोलीस दल सन्मान करत असल्याचे दिसते. मन्मथ स्वामी हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या वतीने जंगम समाजातील शेकडो निराधारांना आधार देणे, कौटुंबिक प्रश्न आपले समजून सोडवणे असे कार्य त्यांच्या वतीने होत असल्यामुळे ते बेसहारा व गोरगरीबांना आधारवड म्हणून पुढे आलेले आहेत. मन्मथ स्वामी यांना पुर्वीपासूनच पोलीस खात्यात सेवा बजावत सामाजिक कार्याची आवड होती. आपण काही देशाचे देणे लागतो म्हणून ते निष्ठेने पोलीस सेवेत कार्य बजावतात व बाकी वेळेत आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी ते पुर्णवेळ कार्यरत राहतात. एक पोलीस म्हणून कार्य करतांना त्यांनी समाजातील अनेक गुन्हे व गुन्हेगारी कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावली असून तसेच समाजातील भांडणे, तंटे त्यांनी समजुतीने सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांची पोलीस खात्यातील सेवा ही उत्कृष्ठ व निष्कलंकपणे राहिलेली आहे. जंगम समाजातील गोरगरीबांना मदत करणे, त्यांच्या सुख दुःखात सामील होऊन आधार देणे. सध्या ज्वलंत असलेला व निकडीचा प्रश्न मोफत विवाह सोहळे व परिचय मेळावे आयोजित करून हुंडा व इतर बाबीला त्यांनी बाजुला सारण्यात मोठा वाटा उचलला आहे. आजपर्यंत त्यांनी जंगम समाजातील ५०० गरीब घरातील मुला मुलींचा विवाह जुळवून आर्थिक बाबीला फाटा देत गोरगरीबांचे संसार सन्मानाने उभे केलेले असून सर्वसामान्यांना भेडसावणारा विवाह या समस्येतून त्यांनी सुटका केली आहे. समाजातील काही कुटुंबावर प्रसंगी दुःखाचा डोंगर ओढावला असतांना व गत १४ महिन्यापासून कोरोना काळात मृत्यू पावलेल्या शेकडो कुटूंबाना स्वतः पुढाकार घेऊन व इतरांना मदतीसाठी आवाहन करून सदर कुटुंबाला आर्थिक सहकार्य करत मदतीचा हात व आधार दिला आहे. या पोलीस खात्यातील समाजसेवकांना कार्याला जंगम समाजात सध्या खुप मानाचे स्थान असून त्यांनी मानवता, माणुसकी, परोपकार व दाणत्व वृत्ती जोपसण्याचे काम खुप उल्लेखनीय व उत्कृष्ठ असून त्यांच्या कार्याचे जंगम समाजासह इतर जनतेच्या वतीने कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्यामुळे ते ज्या पोलीस खात्यात कार्यरत आहेत त्या पोलीस सेवेचा मान, सन्मान, प्रतिष्ठा नक्कीच उंचावलेली असून त्यांचे सदर कार्य पोलीस विभागाने दृष्टीक्षेपात ठेवून त्यांचा यथोचित सन्मान व गौरव करावा अशी पेक्षा जंगम समाज व सर्व जनतेच्या वतीने व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.