इंधन दरवाढीच्या विरोधात औशात काँग्रेसचे आंदोलन
औसा
मुख्तार मणियार
*औसा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने सोमवार दिनांक 07 जून 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता उदय पेट्रोल पंपाच्या समोर औसा येथे केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात* केंद्रातील मोदी सरकारचा तीव्र निषेध करून आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन शासनाने कोरोनासंदर्भात घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आंदोलन केले.यावेळी या आंदोलनात
यावेळी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे ,तालुका अध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शेख शकील, संदीप पाटिल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले,नगरसेवक अंगद कांबळे, व माजी नगरसेवक, गुलाब शेख, प्रा सुधीर पोतदार ,खुंदमीर मुल्ला,नियामत लोहारे, अल्पसंख्याकांचे अध्यक्ष हमीद सय्यद, ,खाजाभाई शेख,हमीद सर,वहीद कुरेशी ,औसा काँग्रेसचे शहरचिटणीस हरिभाऊ शिंदे ,राजेंद्र बाजुळगे,राजेंद्र बनसोडे, , शब्बीर शेख,मुजम्मील शेख, खाजा शेख,सत्तार काझी ,माजीद काझी,नंदुकुमार सरवदे आदिनी या आंदोलनात सहभाग घेऊन मोदी सरकारचा निषेध केला.कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही, अनेकांचे रोजगार या कालावधीमध्ये गेले आहेत.याचा परिणाम सर्वच जनतेवर पडला आहे. त्यामध्ये केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली आहे. गॅस पेट्रोल व डिझेलच्या किमतीमध्ये वाढ केल्यामुळे सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत या भाववाढीच्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दरवाढ कमी करावी यासाठी आंदोलन केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.