*राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - ९० टक्के गुण घेणाऱ्या, विद्यार्थ्यांना मिळणार मोठे अनुदान*
उस्मानाबाद,* बातमी ।। दि 25 अल्ताफ शेख प्रतिनिधि
अनुसूचित जातीतील - 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या, आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा - राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली
*काय म्हणाले धनंजय मुंडे ?*
सामाजिक न्याय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार - अनुसूचित जातीतील गरीब कुटुंबातील मुलांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी - 11 वी व 12 वी
या दोन वर्षात, प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्यात येतील
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त करणे आणि त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न - 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
त्याचप्रमाणे MH-CET, JEE, NEET यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पूर्वतयारीसाठी याचा फायदा होणार, दरम्यान - याविषयी आणखी काही अपडेट आले तर, आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहचवू
*राज्य सरकारचा निर्णय* - प्रत्येक विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाचा आहे -
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.