*भाजपची ऑनलाईन प्रदेशकार्य समितीची बैठक*
दि 25: कोरोना च्या संकटामुळे 24 जुन रोजी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र तर्फे आयोजित ऑनलाईन बैठक जिल्हा भाजपा कार्यालय उस्मानाबाद येथे संपन्न झाली.
याप्रसंगी बैठकीला मुंबई प्रदेश कार्यालयातून मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजाताई मुंडे यांनी मार्गदर्शन केले प्रदेश कार्यालयात जसे बैठकीचे आयोजन केले जाते तशाच प्रकारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयात जिल्हा अध्यक्ष व सर्व अपेक्षित कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली, याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी एन डी ए सरकारची सात वर्षाच्या कामगिरी बद्दल माहिती दिली, त्यानंतर दुपारी जेवणानंतर बैठक पुन्हा सुरू झाली याप्रसंगी दोन प्रस्ताव घेण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी देवेंद्र फडणवीस यांच्या समारोपीय भाषणानंतर राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला या बैठकीस जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य एडवोकेट व्यंकटराव गुंड, प्र का स एडवोकेट मिलिंद पाटील, प्र का स सुधीर पाटील जिल्हा सरचिटणीस एडवोकेट नितीन भोसले तसेच सर्व मंडळ अध्यक्ष तुळजापूर व जिल्हाभरातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने पूर्णवेळ उपस्थित होते
आपल्या परिसरातील चालु घडामोडी पाहत रहा बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Web :www.laturreporter.in
रिपोर्टर *सय्यद महेबूबअली*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.