औशात विकास कामांचे शुभारंभ व लोकार्पण सोहळा

  औशात विकास कामांचे शुभारंभ व लोकार्पण सोहळा
















औसा मुख्तार मणियार

औसा नगरपरिषदेच्या वतीने मागील कालावधीत साईड अॅड सर्व्हिसेस,किल्ला परिसर येथील नवीन जलकुंभ तसेच बस्थानका समोरील नूतन व्यापारी संकुलनाचा लोकार्पण सोहळा आणि जमाल नगर तलाव सुशोभीकरण, मुक्तेश्वर तलाव सुशोभीकरण, तलावातील बोटींग सेवा आणि शहरातील विविध ठिकाणी सुरू होत असलेल्या अॅक्वा वॉटरचा शुभारंभ आज दिनांक 25 जुन 2021 शुक्रवार रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री व पाणीपुरवठा मंत्री जयंत पाटील,यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यमंत्री संजय बनसोडे धनंजय मुंडे,रुपाताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय काॅग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी आमदार बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जमाल नगर तलाव औसा येथे सुशोभीकरण व लोकार्पण सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनेसह जमाल नगर तलाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय शेटे,आ.विकरम काळे,श्रीमती आशाताई भिसे,आदि मान्यवरांची उपस्थिती होतीे.यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा औसा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ अफसर शेख व औसा नगरपालिकेच्या वतीनेे  घेण्यात आला.यावेळी या लोकार्पण सोहळ्यात औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी वसुधा फड, उपनगराध्यक्षा जहॉअरा तत्तापुरे,माजी नगराध्यक्ष जावेद शेख,मेहराज शेख,भरत सूर्यवंशी, पाणी पुरवठा सभापती गोंवीद जाधव, बांधकाम सभापती सौ कीर्ती कांबळे,मुजाहेद शेख, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शिवाजी सावंत, श्रीकांत सुर्यवंशी, शहराध्यक्ष संतोष औटी, नूतन शहर उपाध्यक्ष जाकेर पटेल,अविनाश टिके,नजीर डॉक्टर,फहाद अरब, बालाजी शींदे, दत्तात्रय कोळपे ,वलीखॉ पठाण, संगमेश्वर उटगे, रुपेश दुधनकर,माजीद काझी, वकील इनामदार, कृष्णा सावळकर, विनायक सुर्यवंशी,युनुस चोधरी,सनाऊल्ला दारुवाले,सयीद सावकार, अल्पसंख्याकांचे जिल्हाध्यक्ष रशीद शेख,दिलावर तत्तापुरे,बासीद शेख नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी आदि उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या