जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन परिसंवाद उत्साहात संपन्न - पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती

 



जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन परिसंवाद उत्साहात संपन्न - पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती







उदगीर : ब्रह्मा कुमारीस विद्यालया मार्फत दि. ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन वर्चुअल जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थित होती. महाऊर्जा लातूर विभागीय महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी, मा.व उच्च मा. शिक्षण मंडळ विभागीय कार्यालय सहाय्यक सचिव संजय पंचगले, लातूर जिल्हा कारागृह वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर बनशेळकीकर व राजयोगिनी ब्र.कु. महानंदा दीदी,  ब्र.कु. छाया दीदी (अहमदपूर) आदी मान्यवरांनी झूम प्लॅटफॉर्म वरती ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला. पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रकाश येरमे, डॉ मारुती चव्हाण, ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर, प्रा.अनिल चवळे यांनी मार्गदर्शन केले. मानसिक प्रदूषण हेच सर्व प्रदूषणाचे कारण असल्याचे मनोगत राजयोगिनी ब्र.कु. महानंदा दीदी यांनी व्यक्त केले. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निसर्ग रक्षणाची गरज आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईक पर्यंत पोहचवून सर्वानी सुरुवात करण्याचे आवाहन पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रकाश येरमे यांनी उपस्थितांना केले. पर्यावरण संरक्षण ही सामाजिक जबाबदारी असून समाजातील प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणासाठी काम करणे ही आपली सामाजिक बांधीलकी आहे, असे प्रतिपादन महाव्यवस्थापक देविदास कुलकर्णी यांनी केले. कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथून डॉ. मारुती चव्हाण यांनी सखोल मार्गदर्शन केले. मानव हा पर्यावरणाचाच एक कुशाग्र घटक आहे, मात्र पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्याचे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण बनले असल्याची मत डॉ. मारुती चव्हाण यांनी मांडले. मानव व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर डाक्यूमेंट्री फिल्म केदार खमितकर यांनी  सादर केले. पर्यावरण कायम हेल्थी ठेवण्यासाठी भविष्यात आपल्याला काम करणे आवश्यक आहे असे प्रा. अनिल चवळे म्हणाले. ब्रह्मा कुमारीस राजयोग एजुकेशन एंड रिसर्च फाउंडेशन कृषी प्रभागद्वारे आंतराष्ट्रीय स्तरांवरती चालू असलेल्या ‘पर्यावरण शिक्षण सुधारणा’ अभियानाची  माहिती राजयोगिनी ब्र.कु. महानंदा दीदी यांनी दिली. ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण आणि कोऑर्डिनेशन अभियंता किरण खमितकर यांनी वरदानी भवन लातूर येथून यशस्वीपणे केले. शुभारंभ दीप प्रज्वलन करून करण्यात आला. प्रसन्न भावनेने डॉ. सुधीर बनशेळकीकर यांनी सुमधुर गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजयोग शिक्षिका ब्र.कु. रश्मी दीदी  यांनी केले तर आभार महादेव खलुरे यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या