नागरसोगा-
*(अफताब शेख)
शासनाने कोविड उपाय योजनेसाठी सर्व निधी आरोग्याकडे वळविला असताना गाव विकासाच्या दृष्टीने मनेरगा अंतर्गत भरीव निधी उपलब्ध असून ही योजना ग्राम विकासासाठी वरदान आहे त्यामुळे कोणत्याही निधीची वाट न पाहता मनरेगा तून कामेकरून गाव समृद्ध करा असे आवाहन कृषी व मनरेगाची माहीती दौऱ्यात नागरसोगा येथे
आ. अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केली.
पचायत समिती सद्स्य दिपक चाबुकस्वार यांनी नागरसोगा येथे २किमी रस्त्याचे मजबुती करण,५सिचन विहीर,५०शोष खडे, सार्वजनिक सिंचन विहीर,६शे बिहार पाॅटर्ण वृक्ष लागवड, मनरेगा अंतर्गत प्रस्तावीत आहेत, असे प्रस्तावने नमुद केले.
यावेळी पचायत सदस्य भास्कर सुर्यवंशी ग्रामपंचायत अडचणी व शेतीला विद्युत पुरवठा वार वार खंडित होत आहे. शेत शिवारात चार डि.पी जळालेल्या आहेत याकडे विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांचे पिके वाळत आहेत अशी व्यथा मांडली,
कृषी व मनरेगा ची माहिती या दौऱ्यानिमित्त नागरसोगा येथे पाच किलोमीटर मातीकाम शेतरस्त्यांची काम,मनरेगा अंतर्गत सलग पडीक, बांधावर , रस्त्याच्याकडेला वृक्ष लागवड, ,अधिक शेतकऱ्यांनी केशर आंबा लागवड करावा जेणेकरून औसा तालुका केशर आंब्याच्या नावाने ओळख होईल असे आ. अभिमन्यू पवार.यांनी आपले मत व्यक्त केले गुरुवारी शेतकऱ्यांशी संवाद साधताना
वृक्ष लागवड, सिंचन विहिरी,शेत रस्ते मजबुती करण,फेवर ब्लाक , गोठा,शेततळे,सिमेंट रस्ता,वयक्तीक लाभाच्या १९ योजनेचा लाभ मनरेगा अंतर्गत घ्यावा ही योजना कागदावरच न राहता प्रत्यक्षात अमलात आणा ७७ योजना असून कृषी सहाय्यकानी योजनेचा अभ्यास करून शेतकऱ्यांना लाभ देण्याचे काम करावीत,महाडीबीटी पोर्टलवर ट्रॅक्टर,यंत्र ऑनलाईन करावे याचा लाभ घ्यावा.
शासकीय अधिकार्यांच्या सहकार्याने औसा विधानसभा मतदारसंघात सर्व योजना यशस्वी होत असून गेल्या १२दिवसात औसा मतदार संघातील ७८ गावचा कृषी व मनरेगाची माहिती दौऱ्यात शासकीय अधिकारी माझ्या सोबत खांद्याला खांदा लावून आहेत, त्यामुळे
अवघ्या चार महिन्यात ५ शे किलोमीटर शेतरस्त्याचे काम पूर्ण झाले असून मतदारसंघात २२७० किलोमीटर शेत रस्ते पूर्ण करण्याचा व त्यासोबत डांबरीकरण करण्याचे मानस आहे. माझा सर्व निधी शेतकऱ्यांसाठी आहे
कोविड निर्बंध पाळा,लसिकरण करून घ्या, लसीकरण ही ढाल आहे असे मार्गदर्शन केले यावेळी औसा तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे , मंडळ अधिकारी एस.व्ही गरगटे,
कृषी मंडळ अधिकारी पिनाटे,संतोषआप्पा मुक्ता ,संजयभाऊ कुलकर्णी, मनरेगा एपीओ सोनकांबळे,भास्कर सूर्यवंशी, उपसरपंच बण्डू मसलकर, शिवाजी फावडे, चेअरमन यशवंतराव शिंदे,मधूकर सुर्यवंशी,रमेश शिंदे, हेड कॉन्स्टेबल संजय फुलारी,कॉन्स्टेबल सिरमवाड प्रल्हाद,
तलाठी रोहित धावडे,लाईनमन बालाजी म्हेत्रे, कृषी सहायक मारोती वाघमारे , कमलाकर सुर्यवंशी, दिलिप पाटील, यशवंतराव सुर्यवंशी,गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
औसा तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे
() गाव निहाय २०हेक्टर फळबाग याची उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने कामाचे नियोजन कृषी विभाग करत आहे .
गेल्या काही वर्षापासून मरगळ आलेल्या या योजनेस आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नामुळे या योजनेस नवसंजीवनी मिळाली आहे . शेतकऱ्यांनी सहकार्य व प्रतिसाद दिला तर खऱ्या अर्थाने ही योजना यशस्वी होईल असा विश्वास औसा तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे व्यक्त केला
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.