कलाम एजुकेशन एंड चैरिटेबल ट्रस्ट तर्फे जागतिक पर्यावरण दिवस निमित्त एम आई डी सी परिसरारत वृक्षारोपण...
औसा (प्रतिनिधी) आज जगात ऑक्सीजनची कमतरता जाणवत आहे.तसेच गेल्या अनेक वर्षांपासून असंतुलित वातावरणामुळे पावसाअभावी अनेक भाग दुष्काळाच्या छायेत आहे.त्यामुळे वातावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करण्याची गरज आहे,तसेच औसा एमआईडीसी येथे मोठ्या प्रमानात लोक मॉर्निंगवॉकला येतात लोकाना स्वच्छ हवा मिळावी ही कलाम ट्रस्ट चे उद्देश गौरवस्पद आहे असे मत एमआईडीसी तिल उद्योजक अजय मूंदड़ा यांनी व्यक्त केले.या वेळी परवेज काजी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. adv शाहनवाज पटेल यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी कलाम एजुकेशन एंड चैरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष पटेल रिजवान यानी ट्रस्ट चा उद्देश् पर्यावरण समतोल राख्नयासाठी आम्ही या वर्षी 100 झाडे लावन्याचा संकल्प आहे त्या साठी वृक्ष प्रेमी नी आम्हाला सहकार्य करावे असे सांगितले या वेळी, सचिव मोहम्मद पंजेशा, पटेल शोहेब,एडवोकेट सिराज पटेल,शेख अमन,मिस्बाह पटेल ,अल्ताफ शेख,साकिब सावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.